दोन पॅनलमध्ये निवडणूक रंगणार; चुरस वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:26 AM2018-07-12T00:26:50+5:302018-07-12T00:27:03+5:30

नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलला शह देण्यासाठी आयमा निवडणुकीतील तुषार चव्हाण गट सक्रिय झाला असल्याने सुरुवातीला बिनविरोध वाटणारी निवडणूक आता दोन पॅनलमध्ये होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बुधवारी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी ६४ अर्ज घेतले आहेत.

Elections will be played in two panels; Churn grew | दोन पॅनलमध्ये निवडणूक रंगणार; चुरस वाढली

दोन पॅनलमध्ये निवडणूक रंगणार; चुरस वाढली

Next

सातपूर : नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलला शह देण्यासाठी आयमा निवडणुकीतील तुषार चव्हाण गट सक्रिय झाला असल्याने सुरुवातीला बिनविरोध वाटणारी निवडणूक आता दोन पॅनलमध्ये होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बुधवारी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी ६४ अर्ज घेतले आहेत.  निमाची निवडणूक बिनविरोध होण्याचे सुरु वातीला दिसत होते; मात्र निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आल्याचे सांगितले जात होते. दरम्यानच्या काळात सत्ताधारी एकता पॅनलला शह देण्यासाठी आयमा निवडणुकीतील एकता पॅनलच्या विरोधातील तुषार चव्हाण, प्रदीप पेशकार गटाने वेगळ्या पॅनलची निर्मिती करण्यास सुरु वात केली आहे. या पॅनलला सकारात्मक प्रतिसाद लाभल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी एकता पॅनल आणि त्यांच्या विरोधातील पॅनलने उमेदवारी अर्ज घेतल्याने आता दोन पॅनलमध्ये निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.  उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (दि. १२) अखेरचा दिवस असल्याने दोन्ही पॅनलचे उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत. निमाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिला असताना केवळ एकच अर्ज दाखल झाला असला तरी बुधवारी ६४ अर्जांची विक्र ी झाली आहे. म्हणजेच आतापर्यंत ८६ अर्जांची विक्र ी झाली आहे. एकता पॅनलचे उमेदवार बुधवारी एकत्रित अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.
उद्योजकांची अग्रणी समजल्या जाणाऱ्या निमा या औद्योगिक संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाल्यानंतर दि. १ जुलैपासून उमेदवारी अर्ज विक्र ीस प्रारंभ करण्यात आला आहे. दि. १२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, तर दि. २२ जुलै उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दि. २९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निमाच्या घटनेनुसार पहिल्या वर्षी मोठ्या उद्योग घटकासाठी अध्यक्षपद राखीव आहे. तर सरचिटणीस, खजिनदार प्रत्येकी एक पद, उपाध्यक्ष दोन पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी, सचिव दोन पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी आणि सिन्नर, दिंडोरी यासह कार्यकारिणीच्या ३४ अशा ४१ पदांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. भुतानी, सहायक विवेक गोगटे, एन. टी. अहिरे काम पाहत आहेत.
आयमा निवडणुकीचे उमटणार पडसाद
सत्ताधारी एकता पॅनलला शह देण्यासाठी भाजपाचे प्रदीप पेशकार, नगरसेवक शशिकांत जाधव, तुषार चव्हाण यांनी कंबर कसली आहे. किंबहुना तशी व्यूहरचना करण्यात येत आहे. आयमा निवडणुकीतील वचपा काढण्याची हीच एक संधी असल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे. बºयाच दिवसांनी निमाची निवडणूक दोन पॅनलमध्ये होणार आहे.

Web Title: Elections will be played in two panels; Churn grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.