जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाची २३ रोजी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:46 AM2017-12-13T01:46:55+5:302017-12-13T01:47:29+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाचा नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी येत्या २३ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे.

Election of 23rd President of District Central Co-operative Bank | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाची २३ रोजी निवडणूक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाची २३ रोजी निवडणूक

Next
ठळक मुद्देबॅँकेच्या संचालक मंडळाची बैठक निवडणूक कार्यक्र म घेण्याचे आदेश

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाचा नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी येत्या २३ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपांतर्गतच रस्सीखेच असून, अन्य संचालकही प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या बॅँकेच्या अध्यक्षपदासाठी २३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली बॅँकेच्या संचालक मंडळाची बैठक होईल. त्यात अध्यक्ष निवडण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यात बॅँकेचे नरेंद्र दराडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हा राजीनामा मंजुरीसाठी सहकार प्राधिकरणाकडे पाठविला होता. प्राधिकरणाने तो मंजूर केला असून, निवडणूक कार्यक्र म घेण्याचे आदेश दिले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बॅँकेला सावरण्यासाठी सत्तारूढ भाजपाचा अध्यक्ष अपरिहार्य असल्याचे संचालकांचे मत आहे. त्यामुळे भाजपाच्या संचालकांमध्ये अध्यक्ष होण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सध्या विद्यमान संचालकांमध्ये खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, माणकिराव कोकाटे, केदा आहेर हे चौघे भाजपाचे संचालक आहेत. अपक्ष असलेले अ‍ॅड. संदीप गुळवे व परवेझ कोकणी भाजपाच्या गोटात सामील झाले असून, कोकणी सध्या भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत भाजपाला मदत केली. सर्व इच्छुकांनी आपापल्या परिने राजकीय समीकरणे जुळवण्याची तयारी केली असली तरी अध्यक्षपदाचा उमेदवार पालकमंत्री गिरीश महाजन यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

Web Title: Election of 23rd President of District Central Co-operative Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक