सरकारकडून आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी- गोविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 08:33 PM2018-08-29T20:33:37+5:302018-08-29T20:35:13+5:30

 Effective implementation of financial policies by the government - Govilkar | सरकारकडून आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी- गोविलकर

सरकारकडून आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी- गोविलकर

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘मोदिनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर

नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेच्य बळकटीकरणाकडे आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाचे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँके ने अहवालात दिला आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी केले.
आयमा नाशिक व लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापुररोडवरील शंकराचार्य संकु लात बुधवारी (दि.२९) आयोजित व्याख्यानात ‘मोदिनॉमिक्स...आर्थिक दृष्टिकोनातील स्थित्यंतर’ या विषयावर गोविलकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर लघुउद्योग भारतीचे विभागीय अध्यक्ष एम.जी.कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय महाजन, निमाचे हरिशंकर बॅनर्जी उपस्थित होते. यावेळी गोविलकर यांनी आपल्या ‘मोदिनॉमिक्स’ पुस्तकामधील आढावा सादर करताना देशाची अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये होत गेलेले सकारात्मक बदल याविषयी चर्चा केली. ते म्हणाले, १९७७-१९९१ या कालखंडात सरकार स्थिर न राहिल्यामुळे देशाच्या आर्थिक धोरणांकडे दुर्लक्ष झाले. देशावर मोठे आर्थिक संकट ओढावले. २००८साली आलेल्या जागतिक मंदीच्या संकटातून सावरण्यासाठी अर्थतज्ज्ञांनी लोकांची क्रयशक्ती वाढवावी, सरकारने खर्च करावा, असा पर्याय सुचविला. तो आजतागायत लागू आहे. तेव्हा सरकारने खर्च करण्यास सुरूवात केली; मात्र हा खर्च सर्वाधिक कल्याणकारी कामांवर करण्यात आला हे दुर्दैव. कारण कल्याणकारी कामांवर खर्च होऊ लागल्याने भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळाला आणि २०१४पर्यंत वित्तीय शिस्तीकडेही दुर्लक्ष झाले. २जी, ३जी, कॉमनवेल्थसारखे घोटाळे उघडकीस आले. देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात आर्थिक धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकली नाही. केवळ धोरणे दर्जेदार असून चालत नाही तर त्यांच्या अंमलबजावणीकडेही लक्ष दिले गेले पाहिजे, असे यावेळी गोविलकर यांनी सांगितले.

अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर
२०१४ पासून आजपर्यंत राष्ट्रीय अर्थव्यवस्था अधिक विकसीत करण्यावर या सरकारने भर दिला. शेतीच्या तीन प्रश्नांपैकी उत्पादनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यास सरकारला यश आल्याचे त्यांनी यावेळक्ष अधोरेखित केले. याप्रसंगी त्यांनी बोलताना सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

Web Title:  Effective implementation of financial policies by the government - Govilkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.