बचतगटातून होणार आर्थिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 07:44 PM2022-03-31T19:44:32+5:302022-03-31T19:46:54+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतीतर्फे महिला बचतगटांना मोफत प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातून अनेक बेरोजगार हातांना रोजगार मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Economic development will come from self-help groups | बचतगटातून होणार आर्थिक विकास

टाकेद येथील महिला बचत गट प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी महिलांना मार्गदर्शन करतांना दीपक भांगरे. समवेत व्यासपीठावर सोमनाथ जोशी, ताराबाई बांबळे, राम शिंदे, स्वप्नील इंगळे,उमेदच्या जया बदादे आदींसह मान्यवर. 

Next
ठळक मुद्देटाकेद येथे मोफत प्रशिक्षण : बेरोजगार हातांना मिळणार रोजगार

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतीतर्फे महिला बचतगटांना मोफत प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातून अनेक बेरोजगार हातांना रोजगार मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बचतगटाचे प्रशिक्षक व मार्गदर्शक दीपक भांगरे, स्वप्नील इंगळे, उमेदच्या जया बदादे व पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ताराबाई रतन बांबळे होत्या तर व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती तालुकाध्यक्षा रुक्मिणी जोशी, ग्रामपंचायत सदस्या लता लहामटे, नंदाबाई शिंदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे, निलेश गायकवाड उपस्थित होते.

शिंदे यांनी गावातील सर्व उपस्थित महिलांना प्रमुख मान्यवरांचा परिचय करून देत सर्वच बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, प्रत्येक समाज घटकातील दलित, पीडित, विधवा, निराधार, परितक्त्या, वंचित महिलांना जिल्हा उद्योग केंद्राकडून, आदिवासी विकास भवन, पंचायत समिती, जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाकडून रोजगारासाठी व्यवसायासाठी विविध योजना राबवून प्रत्येक महिला भगिनी आत्मनिर्भर कशी करता येईल व बचतगटांमार्फत कोणकोणते व कसे काय व्यवसाय करता येतात याचे मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शन दीपक भांगरे यांनी बचतगट कसा स्थापन करावा, बचतगटांमार्फत कोणकोणत्या आर्थिक वृद्धिंगत व्यवसायाच्या संधी, सुविधा, रोजगार आत्मनिर्भरतेने करता येईल व बचत गटांतील महिलांना कसे अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांच्या आर्थिक समस्या मिटविण्यासाठी दोन हातांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल व बचतगटात कसे काम केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश गायकवाड, मंगल डोळस, लता लहामटे, शिला लगड, दुर्गा जाधव, दुर्गा बांबळे, भारती लोखंडे, शमीन शेख, अनिता गायकवाड, पूर्वा दातरंगे, रंजना पाबळकर आदींसह अनेक महिलांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन आदर्श अंगणवाडी सेविका मंगल डोळस यांनी केले तर आभार प्रदर्शन रुक्मिणी जोशी यांनी केले.
 

Web Title: Economic development will come from self-help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.