खिरवस खाल्ल्याने एकाच कुटूंबातील आठ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:12 PM2018-03-01T15:12:17+5:302018-03-01T15:12:17+5:30

देवळा : तालुक्यातील खालप येथील एकाच कुटुंबातील पाच मुले, दोन महिला व एक पुरूष अशा आठ जणांनी गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ल्याने विषबाधा झाली असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Eating out of Khurvus is one of eight people poisoning | खिरवस खाल्ल्याने एकाच कुटूंबातील आठ जणांना विषबाधा

खिरवस खाल्ल्याने एकाच कुटूंबातील आठ जणांना विषबाधा

Next

देवळा : तालुक्यातील खालप येथील एकाच कुटुंबातील पाच मुले, दोन महिला व एक पुरूष अशा आठ जणांनी गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ल्याने विषबाधा झाली असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्यांमध्ये एका चार वर्षाच्या बालकाचा समावेश असून सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे यांनी दिली. खालप ता. देवळा येथील इंदिरानगर अदिवासी वस्तीत राहणाºया श्रीराम गंगाधर जाधव (४०) हे दिवसभराचे काम आटोपून घरी आले असता कुटुंबातील सदस्य हिरु बाई गंगाधर जाधव (५५), श्रीराम गंगाधर जाधव (४०), नेहा श्रीराम जाधव (१५), निकिता श्रीराम जाधव (१३), ओम श्रीराम जाधव (१२), साई श्रीराम जाधव (०४), केदाबाई वामन साठे (४५) व राणी वामन साठे (१६) यांनी सकाळी तयार करून ठेवलेले गाईच्या दुधाचे खिरवस खाल्ले. त्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सर्वांनामळमळ व उलटयाचा त्रास जाणवू लागला. सदर घटना जाधव यांची पत्नी छाया यांनी आजूबाजूच्या नागरिकांना सांगितली असता त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले. रूग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे यांनी सर्व रु ग्णांवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होऊन सर्व सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.

Web Title: Eating out of Khurvus is one of eight people poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक