पेठ फाट्यावर एकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:42 AM2018-11-20T00:42:20+5:302018-11-20T00:42:37+5:30

इमारतीजवळ पडलेली वीट बाजूला फेकत असताना ती हातगाडीवर पडल्याने त्याचा राग आलेल्या दोघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) पेठ फाट्यावरील एरंडवाडीत घडली़

 Eating a breathtaking ass on Peth Phat | पेठ फाट्यावर एकास बेदम मारहाण

पेठ फाट्यावर एकास बेदम मारहाण

Next

नाशिक : इमारतीजवळ पडलेली वीट बाजूला फेकत असताना ती हातगाडीवर पडल्याने त्याचा राग आलेल्या दोघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) पेठ फाट्यावरील एरंडवाडीत घडली़  पंचवटी पोलीस ठाण्यात सोनू जहाल याने दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळच्या सुमारास एरंडवाडी येथील इमारतीजवळ पडलेली वीट त्यांनी बाजूला फेकली असता ती संशयित उत्तम दिघोळे यांच्या हातगाडीवर पडली़ याचा राग येऊन दिघोळे व त्यांच्या दोन पुतण्यांनी जहाल यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ यामध्ये जखमी झालेल्या जहाल यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून संशयित दिघोळेस अटक केली आहे.
महिलेचा विनयभंग
मोबाइलवर अश्लील संदेश व फोटो पाठवून तसेच पाठलाग करणाऱ्या संशयिताविरोधात अंबड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़ अंबड लिंक रोडवरील उपेंद्रनगर परिसरातील एका महिलेस अश्लील संदेश व फोटो पाठवून सोबत वाईट कृत्य करण्याची मागणी केली़ यानंतर महिलेची इच्छा नसताना मैत्री करण्यासाठी मोबाइल तसेच पाठलाग करून विनयभंग केला़ याप्रकरणी पीडित महिलेने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली़

Web Title:  Eating a breathtaking ass on Peth Phat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.