वृक्ष कोसळून चारचाकी वाहनाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 01:41 AM2018-06-11T01:41:50+5:302018-06-11T01:41:50+5:30

इंदिरानगर : सावरकर सभागृहालगत गुलमोहराचे वृक्ष कोसळून चारचाकी वाहनाचे नुकसान झाले.

 Due to tree collapse, four-wheeler vehicle damage | वृक्ष कोसळून चारचाकी वाहनाचे नुकसान

वृक्ष कोसळून चारचाकी वाहनाचे नुकसान

googlenewsNext

इंदिरानगर : सावरकर सभागृहालगत गुलमोहराचे वृक्ष कोसळून चारचाकी वाहनाचे नुकसान झाले.
श्रीजयनगर पाठीमागे असलेल्या सावरकर सभागृहालगत रविवारी (दि. १०) सकाळी अचानक गुलमोहर वृक्ष एका चारचाकी वाहनावर कोसळल्याने मोठा आवाज झाला, त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर आले असता त्यांना वाहनावर वृक्ष कोसळल्याचे दिसले. नगरसेवक अजिंक्य साने, सचिन कुलकर्णी, धीरज वझरे, संकेत जाधव, राहुल लोखंडे यांसह नागरिकांसमवेत वाहनावर पडलेले वृक्ष उचलण्याचा प्रयत्न केला. तसेच तातडीने घटनेची माहिती अग्निशामक दलास दिली असता घटनास्थळी येऊन अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाहनावरील कोसळलेले वृक्ष हटविले.
धोकादायक वृक्ष आणि त्याच्या फांद्या तोडण्यासाठी सुमारे चार महिन्यांपासून अर्ज व संबंधित वृक्षाचे छायाचित्र देऊनसुद्धा मनपाच्या संबंधित विभागास परवानगी मागूनही मिळत नसल्याने अशा घटना घडत आहे.
- डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक

Web Title:  Due to tree collapse, four-wheeler vehicle damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.