खड्यांमुळे वाहनचालकांना व्याधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 04:41 PM2018-11-16T16:41:18+5:302018-11-16T16:41:42+5:30

मानोरी : नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गलगत असलेल्या येवला तालुक्यातील मुखेड फाटा ते मुखेड या पाच किलोमीटर रस्त्याची दिवसेंदिवस दुरवस्था वाढत चालली असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांनी वाहन चालक पुरते त्रस्त झाले आहे.

 Due to the rocks, the driver suffers | खड्यांमुळे वाहनचालकांना व्याधी

मुखेड फाटा - मुखेड रस्त्यावर मानोरीतील तिपायले वस्तीजवळ रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे. 

Next
ठळक मुद्देमुखेड :फाटा ते मुखेड रस्त्याची दुरवस्था



मानोरी :
नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गलगत असलेल्या येवला तालुक्यातील मुखेड फाटा ते मुखेड या पाच किलोमीटर रस्त्याची दिवसेंदिवस दुरवस्था वाढत चालली असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांनी वाहन चालक पुरते त्रस्त झाले आहे. खड्यांच्या या वाढत्या त्रासामुळे या पाच किलोमीटर रस्त्याने प्रवास करताना काही रस्ता डांबरीकरण आ िणकाही रस्ता खड्याने व्यापला असून हा पाच किलोमीटर अंतराचा रस्ता म्हणजे वाहनचालकांना कभी खुशी तर कभी गम सारखा या प्रमाणे रस्त्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर वाहनचालक आ िण ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा या रस्त्याने प्रवास करताना चार चाकी वाहनाचे पाठे तुटणे, नट बोल्ट गळून पडणे, वाहनांमध्ये बिघाड होणे, असे प्रकार या रस्त्यावर वारंवार घडत आहेत. तसेच खड्यामुळे वाहनचालकांना मणक्याचे, पाठीचे आजार देखील उदभवले असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे. येवला येथील तालुका स्तरीय कामकाज, कांदा बाजार, आदी शासकीय कामासाठी येवल्याला जाण्यासाठी हा मुखेड फाटा ते मुखेड हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याने येवला येथील महाविद्यालयात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड,सत्यगाव , वाकद, मानोरी फाटा आदी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असून यातील बरेच विद्यार्थी मोटारसायकल ने येवला येथे जात असतात. परंतु रस्त्याच्या या दुरावस्थामुळे मोटारसायकल मध्ये बिघाड होणे, नट बोल्ट गळून पडणे आदी प्रकार घडत आहे.त्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी झुडपानी साइड पट्ट्या व्यापलेल्या असल्याने दोन मोठ्या वाहनांना शेजारून जाताना अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावर अधून मधून डांबर आण िखडी टाकून डागडुजी केली जाते परंतु ही डागडुजी काही दिवसातच निघून जात आहे. मागील काही मिहन्यांपासून मोटारसायकल आण िचारचाकी वाहनांना बाजारात सफेद एलईडी बल्प बेकायदेशीर पणे स्वस्तात बसून मिळत असल्याने अनेक वाहन चालक आपल्या वाहनाचा मुख्य बल्प न वापरता सफेद एलईडी बल्प वापरत असल्याने ग्रामीण भागात रस्त्याच्या अरु ंद स्थिती मुळे अपघातात नेहमी वाढ होत आहे.रात्रीच्या वेळी प्रवास करताना समोरून सफेद एलईडी बल्प च्या तीव्र प्रकाश वाहन चालकाच्या डोळ्यासमोर पडत असल्याने दुसर्या वाहन चालकाला वाहन बाजूला घेण्यासाठी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालक थेट काटेरी झुडपात जाऊन पडत असल्याने या सफेद एलईडी बल्प वाहन चालकांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी वाहन चालक आण िग्रामस्थांकडून होत आहे.अनेक वाहन चालक रस्त्याच्या दुरावस्थामुळे मुखेड ते जळगाव नेऊर या पर्यायी मार्गाचा अवलंब करून रहदारी करत आहे.मानोरी बुद्रुक येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सकाळची बस सेवा रस्त्याच्या आण िकाटेरी झुडपांच्या दुरावस्थामुळे बंद होती.ही दुरवस्था ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दीड किलोमीटर रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवत काटेरी झुडपे देखील काढली होती.आण िमानोरी बुद्रुक ते देवगाव या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या काटेरी झुडपे देखील मानोरी च्या ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून स्वखर्चाने काढल्या आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी किती दिवस स्वखर्चाने रस्त्याची काटेरी झुपडे आण िरस्त्यावर मुरूम टाकावा ? असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागावर उपस्थित केला आहे .तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करून या मुखेड फाटा ते मुखेड या पाच किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण आण िरु ंदीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

Web Title:  Due to the rocks, the driver suffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.