नियामक सस्थांचे नियंत्रण वाढल्याने मुक्त विद्यापीठांच्या कामकाजात मर्यादा -नागेश्वर राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:16 PM2019-04-12T17:16:57+5:302019-04-12T17:28:12+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये मुक्त विद्यापीठांच्या कार्यपद्धतीवर नियामक संस्थांचे नियंत्रण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठांच्या कामकाजावर अनेक मयार्दा येत असून अशा परिस्थितीत या दुरस्थ शिक्षण प्रणालीतून शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यांनी स्वत:ला प्रयत्नपूर्वक  सिद्ध करून दाखविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे असल्याचे प्रतिपादन इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलुगुरू प्रा. नागेश्वर राव यांनी केले. 

Due to the increase in control of the regulatory authorities, Nageshwar Rao, limited by the work of the University | नियामक सस्थांचे नियंत्रण वाढल्याने मुक्त विद्यापीठांच्या कामकाजात मर्यादा -नागेश्वर राव

नियामक सस्थांचे नियंत्रण वाढल्याने मुक्त विद्यापीठांच्या कामकाजात मर्यादा -नागेश्वर राव

Next
ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे रौप्यमहोत्सवी पदवीदान दिक्षांत सोहळ्यात प्रातिनिधिक 130 विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान करून गौरवविद्यापीठातील एकूण १ लाख ४८ हजार २६० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

नाशिक : गेल्या काही वर्षांमध्ये मुक्त विद्यापीठांच्या कार्यपद्धतीवर नियामक संस्थांचे नियंत्रण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठांच्या कामकाजावर अनेक मयार्दा येत असून अशा परिस्थितीत या दुरस्थ शिक्षण प्रणालीतून शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यांनी स्वत:ला प्रयत्नपूर्वक  सिद्ध करून दाखविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे असल्याचे प्रतिपादन इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलुगुरू प्रा. नागेश्वर राव यांनी केले. 
 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २५ व्या पदवीदान सोहळ््यात ते उपस्थितांना मार्गदर्शन करीतांना ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, यशंवतराव चव्हाण विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन, कुलसचीव डॉ. दिनेश भोंडे आदिंसह विद्यापीठाच्या विविध विभांगाचे प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी विद्यापीठ प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.  प्रा. नागेश्वर राव म्हणाले, भविष्यातील व्यावासायिक संधिचा विकास करणाºया शिक्षण क्रमांची निर्मिती गरजेची असून असून मानवी अस्तित्वासाठी ज्ञान व कौशल्य आवश्यक आहे. मुक्त विद्यापीठे अशाच शिक्षणाची निर्मिती करीत आहे. त्यासाठी आधुनिकत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अशा तांत्रिक व व्यावसायिक स्वरुपाचे शिक्षण क्रम, आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड,शिक्षणक्रम निवडीची लवचिकता श्रेयांक संक्रमण सुविधा अभ्यासक्रमाचे विस्तृत जाळे, शास्त्रीय मुल्यमापन पद्धतीचा वापर आणि गुणवत्तेचा आग्रह अशा विविध पैलुंचा शिक्षणक्रमातील समावेश हे मुक्त विद्यापीठाचे वेगळेपण असल्याचे त्यांनी नमूद केले.  दूरशिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण पूर्ण करणाºया व्यक्तींच्या व्यावसायिक कौशल्यामध्ये वाढ होते. बदलत्या जीवनमानानुसार सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, क्षेत्रांसोबत जीवनशैलीतही मोठया प्रमाणात बदल झाले असून बदलत्या तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत असताना नवपदवीधरांच्या जबाबदाºयाही वाढल्या असून त्यांनी स्वत:ला सिद्ध करण्याचे आवाहनतही प्रा. नागेश्वर राव यांनी केले आहे.

प्रत्याभूत परिषदेच्या परीक्षणास सामोरे जाणार
विद्यापीठ आता लवकरच राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्याभूत परिषदेच्या परीक्षणास (नॅक) सामोरे जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठ तयारी करीत आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांची नोंदणी ते अंतिम निकाल या सर्व प्रक्रिया आधुनिक संगणक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पूर्ण केल्या जातात. विविध गरजानुरूप शिक्षणक्रम सुरु करण्याच्या विद्यापीठाच्या योजना आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय सेवा प्राप्त करून देणे महत्वाचे आहे. त्यासाठी अभ्यासकेंद्राचे पुनर्परीक्षण व त्यांचे सक्षमीकरण प्रक्रिया विद्यापीठाने हाती घेतली आहे. - प्रा. ई. वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
 

दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे  यावर्षी १ लाख ४८ हजार २६० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.  प्रत्यक्ष दिक्षांत सोहळ््यात विविध ४२ पदविका, ३ पदव्युत्तर पदविका, ५१ पदवी, ३१ पदव्युत्तर पदव्या, ३ विद्यानिष्णात व एक विद्यावाचस्पतीची पदवी प्रदान करण्यात आली. 


विद्याशाखानिहाय सुवर्णपदक  वजेते 
* मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे : सुनीता सोडनर, अंबिता ढवळे, विलास मुल्यमवार,  शिवाजी सावंत, शकीना आतार, सुषमा भापकर, रत्ना जाधव, माधुरी  शेलार, सोमनाथजमदाडे, रेश्मा  केदार, नीलेश पवार, सरिता कदम, महादेव  ढगे. 
* वाणिज्य व व्यवस्थापन : पूजा आंबेकर, महेश कुबल, वैभव खंडागळे, वैशाली जाधव, नीलम पांडे. 
* विज्ञान व तंत्रज्ञान : मृण्मयी पंडित. 
* कृषिविज्ञान : तेजस्विनी शिंदे, प्रिया  बोडके, प्रशांत  तेली, देविदास  खरात, प्रीती  सुरासे, निकिता झोरे, नितीन मेहेत्रे. 
* निरंतर शिक्षण : सिमरन छाबडा, गुंजाली  चोपडेकर. 
* संगणक  : अभिषेक शिंगाडे. 
* आरोग्यविज्ञान: खान साब्रीन मोहमंद रफिक, प्राची  सावंत. 
* शैक्षणिक सेवा विभाग : ज्ञानेश्वर शिरसाठ, नंदकिशोर ठाकरे. 

 

Web Title: Due to the increase in control of the regulatory authorities, Nageshwar Rao, limited by the work of the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.