गॅस पाइपलाइनमुळे औद्योगिक विकासाला गती मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:55 AM2018-11-23T00:55:12+5:302018-11-23T00:58:15+5:30

नाशिक : केंद्र सरकारच्या शहर गॅस वितरण योजनेमुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिककरांना थेट स्वयंपाक घरापर्यंत पाइपलाइनद्वारे गॅस उपलब्ध होणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातही गॅसमुळे ऊर्जेचा स्वस्त व स्वच्छ पर्याय उपलब्ध होणार असल्याने नाशिक व धुळ्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गुरुवारी (दि.२२) केले.

Due to gas pipelines, industrial development can accelerate | गॅस पाइपलाइनमुळे औद्योगिक विकासाला गती मिळेल

शहर गॅस वितरण योजनेचा शुभारंभ करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल. समवेत बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, राजेश पांडे, ए. एम. तांबेकर आदी.

Next
ठळक मुद्देसुभाष भामरे : शहर गॅस वितरण योजनेचे भूमिपूजन

नाशिक : केंद्र सरकारच्या शहर गॅस वितरण योजनेमुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिककरांना थेट स्वयंपाक घरापर्यंत पाइपलाइनद्वारे गॅस उपलब्ध होणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातही गॅसमुळे ऊर्जेचा स्वस्त व स्वच्छ पर्याय उपलब्ध होणार असल्याने नाशिक व धुळ्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गुरुवारी (दि.२२) केले.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन व गेल (इंडिया) यांनी संयुक्तरीत्या स्थापन केलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या लिमिटेडच्या (एमएनजीएल) माध्यमातून नाशिक, धुळे व औरंगाबाद जिल्ह्णातील औद्योगिक आणि घरगुती एलपीजी पुरवठा थेट पाइपलाइनद्वारे करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याचवेळी नाशिक येथे रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक व धुळे येथील प्रकल्पांच्या कोनशिलेचे अनावरण केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, एमएनजीएलचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे व व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर आदी उपस्थित होते. या योजनेअंतर्गत शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक सीएनजी गॅसचा पुरवठा होणार असून, येत्या तीन महिन्यांत शहरात सुमारे चाळीस ते पन्नास सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. देशातील पारंपरिक पेट्रोल, डिझेल व कोळशाचा वापर कमी व्हावा यासाठी स्वच्छ नैसर्गिक गॅसला प्रोत्साहन देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून नवव्या टप्प्यात १२९ जिल्ह्णांमधील ६५ प्रादेशिक विभागांमध्ये सीएनजी गॅस वितरण योजनेस सुरुवात झाली असून, दहाव्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (सीजीडी) च्या लिलाव प्रक्रियेलाही सुरुवात झाल्याचे भामरे यांनी सांगितले.
नाशिकसाठी पालघर येथून शंभर किलोमीटर गॅसवाहिनी टाकण्यात येणार असून, हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. तत्पूर्वी नाशिक शहरात चाळीस ते पन्नास ठिकाणी सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी टॅँकरने गॅस पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांतच मोटारींसाठी सीएनजी गॅस उपलब्ध होणार आहे.सध्या पेट्रोल आणि डिझेल महाग होत चालले आहेत. त्यामुळे इंधन वापराबाबत अडचण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सीएनजीचा स्वस्त पर्याय उपलब्ध आहे. शिवाय सीएनजी पर्यावरणपूरक असून, घरगुती वापरासाठीही स्वस्त आहे. अनुदानित सिलिंडर साडेपाचशे रुपयांपर्यंत जाते तर सीएनजी साडेतीनशे रुपयांत पडतो. त्याचप्रमाणे सीएनजी वापरामुळे प्रदूषणात ५० टक्क्यांपर्यंत घट होऊन नाशिकचे पर्यावरण संवर्धनही साधले जाईल.
- जयकुमार रावल, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य

Web Title: Due to gas pipelines, industrial development can accelerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार