Drought threatens farm crops ... | धुळीमुळे शेत पिके धोक्यात...
धुळीमुळे शेत पिके धोक्यात...

ठळक मुद्देखेडलेझुंगे : वाळु पोयटा वाहतुकीमुळे शेतीची नासाडी

खेडलेझुंगे : रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकर्यांना त्यांचा शेतीमाल वाचिवणे अत्यंत जिकरीचे होत आहे. डांळीव, मिरची, उस, कांदा, मका यांसारख्या पिंकावर धुळीची चादरच पसरलेली आहे. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आलेले आहे. आधीच आस्मानी व सुलेमानी संकटांत सापडलेला शेतकरी हा येथुन होणारी वाळु व पोयटा वाहतुकीमुळे हैराण झालेले आहेत.
दिवसांतुन ५० च्यावर हायवा कोळगांव येथुन वाळु, पोयटा मातीची वाहतुक करतात. त्यामुळे रस्त्यांची पुर्ती वाट लागलेलीच आहे. खेडलेझुंगे मार्गे होणारी ही वाहतुन गावातील बर्यांच अधिकारी व नागरीकांनी मागील मिहन्यात मोठ्याप्रमाणावर पेपरबाजी करत वाहतुक बंद केली होती. जिल्हा परिषद मालकीचे भर रस्त्यांवर जेसबीच्या सहाय्याने चर खोदण्यात आले. त्यातुन त्रास झाला तो फक्त सर्व सामान्य जनतेलाच. शेत मालाची वाहतुक करण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणावर त्रास सहन करावा लागला. आज रोजी याच रस्त्याने होणारी वाहतुक बघता प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. पदाधिकारी व प्रशासनाने खेडल्यातुन वाहतुक बंद केली होती तर पुन्हा कुणाच्या कृपाशिर्वादाने चालु करण्यात आली हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
कोळगांव ङ्क्त खेडला रोडलगतच्या शेतकऱ्यांना या वाहतुकीमुळे खुप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतुकीमुळे त्यांच्या शेतमालाची नासाडी होत आहे. सदरचा रस्त्याचे डांबरी करणातुन मातीच्या रस्त्यात रु पांतर झालेले आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत वारंवार स्थानिक प्रशासनास कळवुनही त्याचा उपयोग झालेला नाही. असे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले.
पिकांवर औषध फवारणी केली असता त्याचा परिनाम पिकावर होत नाही कारण येथुन होणार्या वाहतुकीमुळे पिकांवर जमलेले धुळीचे कण हे औषध शोषुन घेतात. पिकांची वाढ थांबलेली आहे. यावर्षी कमी पाऊस, अवकाळी पाऊस, शेत मालाला भाव नाही यामुळे शेतकरी हवालिदल झालेला असतांनाच या मार्गाने होणारी अवैध वाळु व पोयटा वाहतुकीमुळे त्यांच्यापुढे मोठे संकट आलेले आहे.
याबाबत आम्ही स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्र ारी केल्या असतां त्यांनी उडवाउडवीचेच उत्तरे दिलेली आहे. तरी सदरच्या मार्गाने कोळगांव येथुन होणारी वाळु व पोयटा वाहतुक तात्काळ बंद करु न आम्हा शेतकºयांना न्याय द्यावा अशी आर्त येथील शेतकरी व रहीवाशी यांनी दिलेली आहे.
माझे रोड लगतच्या शेतात कांदे असुन त्यावर पुर्णपणे धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे कांदा पिक धोक्यात आलेले आहे. कांद्याच्या पातीवर पुर्णत: धुळीचे साम्राज्य पसरलेले असल्याने कांद्याची वाढ थांबलेली आहे. त्यामुळे परिसरातुन होणार वाहतुक बंद करु न आम्हास न्याय मिळावा.
-बाळासाहेब दगु घोटेकर.
गव्हाच्या ओंब्यामध्ये धुळीचे कण आहेत त्यामुळे पाहीजे त्याप्रमाणात गव्हाचे वाढ झाली नाही. त्यामुळे यावर्षी गव्हाची उत्पादन कमी होवुन आर्थिक नुकसान होणार आहे. तरी या परिसरातुन होणारी वाळु व पोयटा वाहतुक तात्काळ बंद करु न आम्हास न्याय द्यावा.
-शुभम रामेश्वर घोटेकर.
 


Web Title: Drought threatens farm crops ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

ताजा खबरें

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

6 minutes ago

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

8 minutes ago

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

13 minutes ago

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

15 minutes ago

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

15 minutes ago

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

16 minutes ago

नाशिक अधिक बातम्या

धारदार हत्यारांसह पुण्याचे चौघे ताब्यात

धारदार हत्यारांसह पुण्याचे चौघे ताब्यात

8 hours ago

यावर्षीही गणवेशाविनाच सुरू होणार शाळा

यावर्षीही गणवेशाविनाच सुरू होणार शाळा

8 hours ago

नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी

नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी

8 hours ago

अखंड सौभाग्याची मनोकामना करत वटपूजन

अखंड सौभाग्याची मनोकामना करत वटपूजन

8 hours ago

आज वाजणार शाळेची पहिली घंटा

आज वाजणार शाळेची पहिली घंटा

8 hours ago

शासनाकडून ‘भोसला’ला हेलिकॉप्टरची भेट

शासनाकडून ‘भोसला’ला हेलिकॉप्टरची भेट

8 hours ago