लिपिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी द्वारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:39 AM2018-11-25T00:39:06+5:302018-11-25T00:39:28+5:30

नाशिकरोड : राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीयांच्या वेतनातील तफावत दूर कराव्यात आदी प्रलंबित मागण्यांसाठी व्यवसाय शिक्षण व ...

 Dormitory for pending demands of clerks | लिपिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी द्वारसभा

लिपिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी द्वारसभा

Next

नाशिकरोड : राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीयांच्या वेतनातील तफावत दूर कराव्यात आदी प्रलंबित मागण्यांसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथे द्वारसभा पार पडली.
महाराष्ट्र राज्य लिपिक हक्क परिषद या संघटनेने मंगळवारी (दि.२७) मुंबई आझाद मैदान येथे पुकारलेल्या एल्गार परिषद व निदर्शन आंदोलनासाठी लिपिक कर्मचारी जाणार आहेत. त्यासंदर्भात त्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर या ठिकाणी द्वारसभेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण गट क कर्मचारी संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष मंगेश मरकड व सरचिटणीस संजय पगारे यांनी मार्गदर्शन करत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Web Title:  Dormitory for pending demands of clerks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.