साहित्यातून माणूसपणाची शिकवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 06:13 PM2019-02-23T18:13:45+5:302019-02-23T18:14:30+5:30

रविंद्र मालुंजकर : ग्रामीण साहित्य संमेलनात प्रतिपादन

 Doctrine of Humanity | साहित्यातून माणूसपणाची शिकवण

साहित्यातून माणूसपणाची शिकवण

Next
ठळक मुद्देग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते झाले.

वाडिव-हे : ग्रामीण भागातून आजही भावगीते, जात्यावरील ओव्या, भावगीते यातून अस्सल ग्रामिण संस्कृती जिवंत आहे. शेतातील पिकांची राखणी, लग्नातील गीते अथवा शेतकऱ्यांच्या समस्या त्यातून नेहमीच साहित्यिकांना प्रेरणा मिळत आली आहे . या साहित्यातूनच माणूस म्हणून जगण्याची शिकवण मिळते, असे प्रतिपादन कवी रविंद्र मालुंजकर यांनी इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित विसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरु न बोलतांना केले.
ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कवि किशोर पाठक, प्रा.राज शेळके, मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे, कवि विवेक उगलमुगले,मंडळाचे अध्यक्ष व साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, जेष्ठ साहित्यिक रामदास वाघ, सौ.सुरेखा बोराडे, प्रा.गिरी, स्वागताध्यक्ष रावसाहेब कातोरे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुंजाजी मालुंजकर यांच्या ‘कोणासाठी’ या कादंबरीचे प्रकाशन मान्यवारांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘वाचन हेच जीवन विकासाचे साधन’या विषयवार जेष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात पूंजाजी मालुंजकर, विवेक उगलमुगले,प्रा.राज शेळके,व सुरेखा बोराडे यांनी सहभाग घेतला. तसेच विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चित्रांगण क्लासेसच्या विद्यार्थ्यांचेही चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रास्ताविक बाळासाहेब पलटने यांनी तर सूत्रसंचालन अ‍ॅड ज्ञानेश्वर गुळवे यांनी केले. प्रारंभी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कथाकथन, कविसंमेलन
द्वितीय सत्रात कथाकथन झाले. कविसंमेलनात सुमारे ५० कवींनी आपल्या रचना सादर केल्या. यावेळी विजयकुमार मीठे,सावळीराम तिदमे,विलास पगार,गौरवकुमार आठवले,राजेन्द्र उगले,डॉ. भास्कर म्हारसाळे,प्रा.संजय जाधव,जासवंदी मोजाड,संजय कान्हव,रविन्द्र पाटिल,अलका कोठवदे,विद्या पाटिल, के.टी.राजोळे, शरद मालुंजकर,अभिमन सोनवणे,सुदर्शन पाटील,रविन्द्र पाटील,अंकुश क्षीरसागर,श्रीयश मालुंजकर, विशाल मुसळे,शरद भोर आदी उपस्थित होते.

Web Title:  Doctrine of Humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक