कॉलेजरोडवर युवकांनाच वाहतूक नियमांची शिस्त का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:32 AM2019-02-26T01:32:05+5:302019-02-26T01:32:22+5:30

कॉलेजरोड आणि वाहतूक नियमांची बेशिस्ती हे समीकरण असले तरी या मार्गावरून जाताना केवळ महाविद्यालयीन युवकच नव्हे तर अनेक जण बेशिस्तीने वागतात.

 Do the students discipline traffic rules on college? | कॉलेजरोडवर युवकांनाच वाहतूक नियमांची शिस्त का?

कॉलेजरोडवर युवकांनाच वाहतूक नियमांची शिस्त का?

googlenewsNext

नाशिक : कॉलेजरोड आणि वाहतूक नियमांची बेशिस्ती हे समीकरण असले तरी या मार्गावरून जाताना केवळ महाविद्यालयीन युवकच नव्हे तर अनेक जण बेशिस्तीने वागतात. या मार्गावर वाहनतळ नाही. रस्त्यात अतिक्रमणे आहेत. चाट भांडाराची गर्दी रस्त्यावरच असते त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत नाही काय हा खरा प्रश्न आहे.
शहरात वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी असतात. म्हणून कॉलेजरोड किंवा या रस्त्याला मिळणारे उपरस्ते यांच्यावर पोलिसांचा वॉच असतो आणि हेल्मेट न घातलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी दिसले की त्यांना हटकलेच म्हणून समजा. हेल्मेट घातली नाही, लायसन आहे का, इन्शुरन्स आहे काय, काहीच नाही सापडले तर पीयूसी आहेत काय यावर तरी अडवले जाते. वाहतूक नियम पालनाविषयी कोणाचे दुमत नसते त्याचे पालन केलेच पाहिजे ते करतानाच मात्र अन्य अडचणींकडे दुर्लक्ष होता कामा नये. कॉलेजरोडवर कुठेही पार्किंग नाही. त्यामुळे रस्त्याच्याकडेला वाहने उभी केली की उचलून नेली जातात. क्लास आणि नोकरी करणाऱ्यांनी वाहने कोठे लावावी हे कळत नाही. कोठे वाहन उभे केलेच तर लगेचच ते उचलले जाते.
अनेकदा तर एखाद्या कामासाठी मुले किंवा मुली जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी मित्रमैत्रिणीची गाडी घेऊन जातात त्याच वेळी पकडले गेले की आणखी अडचण होते, अनेकदा तर पालकांना फोन करायला सांगितला जातो किंवा कधी करू दिला जात नाही. पॉकीटमनीपेक्षा अधिक दंड भरणे म्हणजे मुलांची दुहेरी अडचण असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाई जरूर करावी, परंतु आधी वाहतुकीच्या अन्य अडथळ्यांचादेखील विचार करण्याची गरज आहे.
रस्त्यावरील अडथळ्यांचे काय?
रस्त्यावर अनेक हॉटेल्स, टपऱ्या आहेत. खाद्य पदार्थांचा आस्वाद सर्वच घेत असतात. परंतु त्याचे अडथळे वाहतूक पोलीस किंवा महापालिकेला दिसत नाही काय? परंतु अशा अनेक वाहतूक अडथळ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ कोचिंगला चाललेले किंवा वेळ झाला म्हणून कॉलेजला घाईत चाललेल्यांना पकडून थेट कारवाई करण्यावरच भर दिला जातो.

Web Title:  Do the students discipline traffic rules on college?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.