पंचवटी एक्स्प्रेसमध्ये देवीची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:33 PM2018-10-15T13:33:47+5:302018-10-15T13:34:03+5:30

इगतपुरी : मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेसमध्ये नवरात्रोत्सव निमित्त देवीची इंजिनपासून तिसऱ्या बोगीत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Diwali installation in Panchavati Express | पंचवटी एक्स्प्रेसमध्ये देवीची प्रतिष्ठापना

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये देवीची प्रतिष्ठापना

Next

इगतपुरी : मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेसमध्ये नवरात्रोत्सव निमित्त देवीची इंजिनपासून तिसऱ्या बोगीत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रतिष्ठापनेचे २६ वे वर्ष असून सोमवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी पंचवटी एक्सप्रेसमध्ये कोच वाढविण्यात यावे, नाशिक कसारा लोकल सेवा सुरू करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी रेल परिषदेचे देविदास पंडित, पंचवटी रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब केदारे, दीपक भदाणे, संतोष शेलार, साहेबराव खर्जुल, गोपीनाथ कासार, पोपट नागरे, ,अनुराधा केदारे, मनोहर पगारे, अरूण गिरजे, संतोष शेलार, अनिल दिवे, गोपीनाथ हगवणे, धनंजय भदाणे, बाळासाहेब मुसळे ,स्वाभिमानी पक्षाच्या संपर्क प्रमुख त्रिवेणी रोकडे, सामाजिक कार्यकर्त्या सुमन शेलार, महिला बँकेच्या अध्यक्ष पुष्पलता उदावंत, विकास हगवणे,योगेश भुतडा उपस्थित होते. यावेळी प्रवाशांनी मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसला अद्ययावत दीनदयाळ उपाध्याय चार ते पाच कोच बसविण्यात यावेत तसेच कसारा लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात. यावेळी पंचवटी गृपच्यावतीने गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतांना गोडसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील असे आश्वासन दिले.

Web Title: Diwali installation in Panchavati Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक