जिल्हा बॅँकेला सक्तीच्या वसुलीचा अधिकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:11 AM2018-03-22T00:11:13+5:302018-03-22T00:11:13+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.

 District Bank does not have the power to compulsorily recover | जिल्हा बॅँकेला सक्तीच्या वसुलीचा अधिकार नाही

जिल्हा बॅँकेला सक्तीच्या वसुलीचा अधिकार नाही

Next

निफाड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.कडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम, लासलगाव कृउबाचे माजी सभापती सुभाष कराड, बाबासाहेब गुजर, उन्मेष डुंबरे, राजेंद्र बोरगुडे, बापू कुंदे, सागर कुंदे, दिनकर मत्सागर, माधव सुरवाडे आदी उपस्थित होते, डोखळे म्हणाले की, सद्य परिस्थितीत कोणालाही अध्यक्ष म्हणून बसवले तरी बँक चालणे अवघड आहे. अशा परिस्थितीत कर्ज भरल्यानंतर जर पुढील हंगामासाठी शेतकºयांना कर्ज मिळण्याची हमी नसेल तर कर्ज भरायचे कसे?, त्यामुळे अशा परिस्थितीत कोणताही शेतकरी कर्ज भरणार नाही. जिल्हा बँकेचे कर्मचारी हेही शेतकºयांची मुले आहेत त्यांनी सक्तीची कर्जवसुली करू नये आणि शेतकºयांची ट्रॅक्टरसह इतर कोणतीही साधने हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा बँकेला शेतकºयांच्या सात बाºयावर बोजा चढविण्याचा कोणताही अधिकार नाही. वसुली करणाºया कर्मचाºयांना शेतकºयांनी धनादेश देऊ नये, असा सल्ला देताना जर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर द्या असे आवाहन डोखळे यांनी केले. यावेळी यतिन कदम, सुभाष कराड, रावसाहेब गोळे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळावा झाल्यानंतर निफाड येथे तहसील निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दिलीप कापसे, विनायक शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करावी
नाशिक जिल्हा बँकेने मागील वर्षी कर्ज वाटप करताना नियमित कर्जफेड करणाºया निफाड तालुक्यावर अन्याय केला आहे. येवला आणि नांदगाव या तालुक्यात जास्त कर्ज वाटप केल्याने निफाड तालुक्यातील द्राक्ष शेती करणाºया शेतक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.ना कर्जच मिळाले नाही. आज जिल्हा बँकेवर २४०० कोटी रु पयांचे पीककर्ज वाटप व ५०० कोटींचे मध्यम मुदत कर्ज वाटप केले आहे. अशा परिस्थितीत बँक पुन्हा सुरळीत सुरू होणे अवघड आहे. बँकेने आधी ७०० कोटी रुपये थकबाकी असणाºया मोठ्या शेतकºयांवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी डोखळे यांनी केली.

Web Title:  District Bank does not have the power to compulsorily recover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.