बक्षिसाच्या रकमेतून शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 04:48 PM2019-01-18T16:48:35+5:302019-01-18T16:49:01+5:30

सामाजिक पुढाकार : एक हजार मुलांना मदतीचा हात

Distribution of school literature from prize money | बक्षिसाच्या रकमेतून शालेय साहित्य वाटप

बक्षिसाच्या रकमेतून शालेय साहित्य वाटप

Next
ठळक मुद्देअजून काही दिवसांत सर्व शाळांना लायब्ररी साहित्य, क्रीडा साहित्य पुरवणार

पेठ : विविध व्यवसाय, नोकरी व उद्योगधंद्याच्या निमित्त शहरी भागात स्थायिक झालेला आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या युवकांनी एकत्र येऊन सामाजिक दायित्व जोपासत क्रीडा स्पर्धामध्ये मिळालेल्या बक्षिसातून आदिवासी मुलांना मदतीचा हात दिला.
नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते भारतज्योती पुरस्काराने सन्मानित निंबा माळी, संतोष गायकवाड, भगवान बाम्हणे यांचेसह मित्रपरिवाराने एकत्र येऊन पेठ तालुक्यातील दाभाडी, डोमखडक, उंबरपाडा, सादडपाडा, कापुर्णे,भाटविहिरा, वडपाडा ह्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शालेय साहित्याचे वाटप केले. निंबा माळी आणि मित्रपरिवाराने नाशिक येथे क्रीडा सामने खेळून पारितोषिकासाठी ठेवलेल्या रकमेतून १००१ वह्या, पेन आणि इतर साहित्य घेवून त्याचे वाटप केले. अजून काही दिवसांत सर्व शाळांना लायब्ररी साहित्य, क्रीडा साहित्य पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सरपंच पुष्पराज जाधव, हेमराज जाधव, वाघेरे , किशोर गवळी, जाधव, तुषार भदाने, केशव महाले, गणेश गवित, चंद्रभान बोराडे, उमेश जाधव, मधूकर गायकवाड , सचिन इंगळे , सुभाष भुसारे यांचे सह शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. तुषार भदाणे यांनी आभार मानले.

Web Title: Distribution of school literature from prize money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.