नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने  वाहनचालकांना  कचरा पिशव्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:41 AM2018-10-20T00:41:03+5:302018-10-20T00:41:24+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी तसेच नूतनीकरण कामासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे.

 Distribution of garbage bags to drivers on behalf of Nashik Regional Transport Department | नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने  वाहनचालकांना  कचरा पिशव्यांचे वाटप

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने  वाहनचालकांना  कचरा पिशव्यांचे वाटप

googlenewsNext

पंचवटी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी तसेच नूतनीकरण कामासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे.
पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते वाहनचालक-मालकांना कचरा पिशव्यांचे वाटप करण्यात आले.  प्रवासी वाहतूक करणाºया सर्व रिक्षा, कूल कॅब, लक्झरी बसवाहनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालक व मालक यांची संपूर्ण माहिती दर्शविणारा फलक, सामान्य जनतेच्या आरोग्याच्या व सार्वजनिक रस्त्यावरील स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक प्रवासी वाहनात कचरापेटी, कचरा पिशव्या ठेवणे बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार टॅक्सी, वाहनचालक व मालक यांची माहिती दर्शविणारा फलक, वाहनात कचरापेटी बसविण्याचा उद्घाटन सोहळा राधाकृष्णन यांच्या हस्ते पार पडला. प्रादेशिक परिवहन विभागाकडून राबविला जाणारा उपक्रम स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून प्रवासी वाहतूक करणाºया टॅक्सी, स्कूल बस, रिक्षा, लक्झरी सर्व बसगाड्यांमध्ये कचरापेट्या बसवल्या जाणार आहेत.
प्रवासी वाहतूक करणाºया सर्व वाहनांमध्ये कचरापेटी बसविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी हा निर्णय घेतलेला आहे. प्रवासी वाहनात अनेकदा प्रवास करताना प्रवासी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, फळांची साले, उरलेले अन्न वाहनांच्या खिडकीतून बाहेर फेकतात परिणामी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरते. नागरिकांना सवय व्हावी तसेच सार्वजनिक स्वच्छता टिकून राहावी यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून हा निर्णय घेतलेला आहे.  - भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title:  Distribution of garbage bags to drivers on behalf of Nashik Regional Transport Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.