निफाड तालुक्यासह नाशिकमधील गौणखनिज वाहतुकीबाबत महसूलमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:05 AM2018-02-11T00:05:20+5:302018-02-11T00:42:05+5:30

ॅनिफाड/ओझर : निफाड तालुक्यासह नाशिकमधील सर्वच तालुक्यांमध्ये वाळू-गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनांवर महसूल प्रशासनाने प्रचंड दंडाची आकारणी केल्याने अनेक शासकीय विकासकामे व खासगी बांधकामे ठप्प झाली आहे.

Discussion with the Revenue Minister regarding the mining of the mineral transport in Nashik with Niphad taluka | निफाड तालुक्यासह नाशिकमधील गौणखनिज वाहतुकीबाबत महसूलमंत्र्यांशी चर्चा

निफाड तालुक्यासह नाशिकमधील गौणखनिज वाहतुकीबाबत महसूलमंत्र्यांशी चर्चा

Next
ठळक मुद्देमार्ग काढण्याचे आश्वासन जिल्ह्यातील विकासकामांना खीळ

ॅनिफाड/ओझर : निफाड तालुक्यासह नाशिकमधील सर्वच तालुक्यांमध्ये वाळू-गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनांवर महसूल प्रशासनाने प्रचंड दंडाची आकारणी केल्याने अनेक शासकीय विकासकामे व खासगी बांधकामे ठप्प झाली आहे. याबाबत आमदार अनिल कदम यांनी मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत निवेदन देऊन चर्चा केली. यातून लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. यावेळी महसूल विभागाचे प्रधानसचिव मनुकुमार श्रीवास्तव, आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, अनिल बाबर, प्रशांत ठाकूर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. वास्तविक शासकीय विकासकामे सुरू असताना ठेकेदार यांच्या बिलातून गौणखनिज रॉयल्टीची कपात केली जाते, तरीही प्रशासन वाहनांवर अन्यायकारक कर आकारणी करत आहे तसेच त्यामुळे निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील विकासकामांना खीळ बसत आहे. याची तत्काळ दखल घेत पाटील यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत वस्तुनिष्ठ माहिती पाठविण्याचे निर्देश दिले व याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

Web Title: Discussion with the Revenue Minister regarding the mining of the mineral transport in Nashik with Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.