जागावाटपाची चर्चा अर्धवट, राष्ट्रवादीने 10 वर दावा सांगितला; भुजबळांनी शिरुर लढण्यावरही दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 03:57 PM2024-03-04T15:57:56+5:302024-03-04T15:59:07+5:30

समृद्धी महामार्गाच्या मुंबईकडील पुढच्या टप्प्याचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भुजबळांनी जागावाटप चर्चा, शिरूर लोकसभेला लढण्याविषयी माहिती दिली. 

Discussion of seat allocation partial, NCP Demand is 10; Chagan Bhujbal also hinted at fighting Shirur Loksabha Election | जागावाटपाची चर्चा अर्धवट, राष्ट्रवादीने 10 वर दावा सांगितला; भुजबळांनी शिरुर लढण्यावरही दिले संकेत

जागावाटपाची चर्चा अर्धवट, राष्ट्रवादीने 10 वर दावा सांगितला; भुजबळांनी शिरुर लढण्यावरही दिले संकेत

कुठेही जायचे असेल तर समृद्धी महामार्ग चांगला आहे. एक चांगली कनेक्टीव्हीटी मिळाली आहे. पुढचा जो रस्ता आहे. तो क्लीयर  झाला तर 70 टक्के गाड्या समृद्धीने जातील. मुंबई-नाशिक ट्रॅफिक सुद्धा कमी होईल. मुंबई-नाशिक ट्रॅफिक सुद्धा कमी होईल, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

समृद्धी महामार्गाच्या मुंबईकडील पुढच्या टप्प्याचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भुजबळांनी जागावाटप चर्चा, शिरूर लोकसभेला लढण्याविषयी माहिती दिली. 

जागावाटपावर बोलताना भुजबळांनी चर्चा अर्धवट आहे, असे सांगितले. जागावाटपावर चर्चा सुरु आहे. आढावा घेतला जात आहे. राष्ट्रवादी तर्फे उद्या आणि परवा 2 दिवस अनेक जिल्ह्यांतील प्रमुख लोक भेटणार आहे आणि बसून विचार करणार आहोत. कुणाची शक्ती कुठे आहे हे सगळे पाहिले जात आहे, असे भुजबळ म्हणाले. आम्ही 10 जागांची मागणी केली हे सत्य असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

गेल्या काही दिवसांपासून भुजबळांना शिरुर मतदारसंघातून उभे केले जाणार अशी चर्चा आहे. यावर भुजबळांनी मी तरी ऐकले नाही असे सांगत काही वेळेस मीडिया सुध्दा आपली इच्छा प्रदर्शित करत असते असे सांगितले. तसेच पक्षाने सांगितलं तर करावे लागते, असे म्हणत थेट नाही असे म्हणण्यास बगल दिली. तुतारी, हात, मशाल कशाचेच आव्हान सध्यातरी दिसत नाही, असेही भुजबळ म्हणाले. 
 

Web Title: Discussion of seat allocation partial, NCP Demand is 10; Chagan Bhujbal also hinted at fighting Shirur Loksabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.