दिंडोरी तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 07:30 PM2019-07-20T19:30:04+5:302019-07-20T19:31:34+5:30

दिंडोरी : शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून पावसाचे आगमनाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.

Dindori taluka hit heavy rains | दिंडोरी तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा

धामणवाडी येथे ओहोळला आलेल्या पुराचे जोपुळ पिंपळगाव रस्त्यावरून वाहनारे पुराचे पाणी.

Next
ठळक मुद्देपश्चिम भागातील धरणांचे पाणलोट क्षेत्रात मात्र अल्प पाऊस झाल्याने अद्याप धरण पाणीसाठा जैसे थे

दिंडोरी : शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून पावसाचे आगमनाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.
दिंडोरी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पेरण्या खोळंबल्या होत्या व झालेल्या पेरण्या व भाजीपाला लागवड पावसाअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र शुक्र वारी (दि.१९) सायंकाळी व रात्री खेडगाव कादवा कारखाना मातेरेवाडी, लोखंडेवाडी, जोपुळ, जानोरी, मोहाडी तळेगाव, खतवड दिंडोरी भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र पावसाचे माहेरघर समजल्या जाणाºया पश्चिम भागातील धरणांचे पाणलोट क्षेत्रात मात्र अल्प पाऊस झाल्याने अद्याप धरण पाणीसाठा जैसे थे आहे.
पूर्व भागात विविध ओहोळ, नाल्यांना पूर आला तरी शनिवारी (दि.२०) निळवंडी पाडे, हातनोरे, मडकीजांब जंबुटके परिसरात चांगला पाऊस झाल्याने कोळवन व धामण नदीलाही पूर आल्याने पालखेड धरणात पाणीसाठा वाढत आहे.
शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली पुन्हा एक दोन तासाने ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. जोपुळ, धामणवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने धामणवाडी येथील ओहोळाला मोठा पूर आला. त्यामुळे जोपुळ पिंपळगाव रस्त्यावर पाणी आले, परिणामी बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान येथे पुलाची आवश्यकता असताना फरशी करण्यात आल्याने रस्त्यावर पाणी आले आहे.
या पावसाने जोपुळ येथील पाझरतलावात चांगले पाणी साचले असून, दिंडोरी शहरात निळवंडी रोडवर जुन्या पंचायत समिती प्रवेशद्वारापुढे देखिल पाणीच पाणी झाले आहे.
रस्त्याची गुणवत्ता उघड
दिंडोरी, पालखेड, लोखंडेवाडी, जोपुळ, पिंपळगाव तसेच लखमापूर, कादवा कारखाना, खेडगाव रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण झाले. मात्र सदर रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तक्र ारी होत्या. त्यातच काही ठिकाणी सिलकोट करणे बाकी राहिल्याने सदर रस्ता पावसात उखडून गेला असून पुन्हा खड्डे पडू लागले आहे.
जोपुळ पिंपळगाव रस्त्यावर धामणवाडी येथे यापूर्वी अनेकवेळा रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे रस्ता नूतनीकरण होताना पूल होणे गरजेचे होते मात्र बांधकाम विभागाने येथे पुला ऐवजी फरशी टाकत छोटे पाईप टाकले.त्यामुळे पुराचे पाणी रस्त्यावर आले व जनतेला त्रास होत असून रस्त्याचेही नुकसान झाले आहे. येथे पूल होणे गरजेचे आहे.
- महेंद्र पगार, धामणवाडी.

 

Web Title: Dindori taluka hit heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस