पाथरे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीची तयारी ६ जानेवारी रोजी दिंडीचे प्रस्थान होणार,सोहळ्याची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 11:57 PM2018-01-04T23:57:03+5:302018-01-05T00:21:01+5:30

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पायी दिंडी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

Dindi will be ready for work on Dethi from Paththar to Trimbakeshwar on January 6 | पाथरे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीची तयारी ६ जानेवारी रोजी दिंडीचे प्रस्थान होणार,सोहळ्याची तयारी पूर्ण

पाथरे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीची तयारी ६ जानेवारी रोजी दिंडीचे प्रस्थान होणार,सोहळ्याची तयारी पूर्ण

Next
ठळक मुद्देपायी दिंडीची परंपरा कायमआकर्षक रथाची भर पडणार

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पायी दिंडी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
येत्या ६ जानेवारी रोजी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पायी दिंडीची परंपरा कायम ठेवत याही वर्षी पाथरे येथून येत्या शनिवारी सकाळी १० वाजता दिंडीचे प्रस्थान होणार आहे. या काळात ज्या- ज्या ठिकाणी दिंडीचा थांबा आहे त्या ठिकाणी चहा, नास्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण ग्रामस्थांच्या वतीने दिले जाणार आहे. या काळात वेगवेगळ्या कीर्तनकारांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आनंद घेता येणार आहे. यात गुरु वारी बबन महाराज अंजनापूर, जयंत महाराज गोसावी, किशोर महाराज खरात यांची कीर्तने होणार आहेत. शुक्रवारी मीराबाई महाराज मिरीकर, कीर्तनकेसरी पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचे कीर्तन होणार आहे, तर शनिवारी काशीनाथ महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दिंडी उतरण्याचे ठिकाण पंचअग्नी आखाडा, निवृत्तिनाथ मंदिरामागे, त्र्यंबकेश्वर येथे असणार आहे. या सोहळ्यात शनैश्वर भजनी मंडळ, दत्त मंडळ, गहिनीनाथ मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे.
रथाची तयारी अंतिम टप्प्यात
या दिंडी सोहळ्यास अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत याही वर्षी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीपासून एका आकर्षक रथाची यात भर पडणार आहे. या रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. श्रीराम भजनी मंडळ पाथरे आणि मनूबाई लुटे सिन्नरकर यांच्या सौजन्याने या रथाची निर्मिती होत आहे. या रथास अंदाजे तीन लाख २० हजार रुपये खर्च आला आहे. या रथात निवृत्तिनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती व प्रतिमा ठेवण्यात येणार आहे. जीपगाडीला रथाचा आकार देण्यात आला आहे. येथील कारागीर मृदंगवादक संतोष सोमवंशी यांच्या कारागिरीतून हा रथ तयार केला जात आहे. रंगरंगोटी, महिरफआदी कामे चालू आहेत.

Web Title: Dindi will be ready for work on Dethi from Paththar to Trimbakeshwar on January 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक