राजापूर परिसरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:04 PM2018-10-09T18:04:42+5:302018-10-09T18:05:54+5:30

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील खरिपाची पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी ती पिके आता काढणीस सुरूवात केली आहे. खरीप पिके हे थोडया फार प्रमाणात आलेले पावसावर शेतकºयांनी खरीपाची पेरणी केली होती. परंतु वरूणराजाचे आगमन न झाल्याने खरीपाची संपूर्ण पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना कामे नाही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूर व तालुक्यातील पूर्वेकडील भागात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच राजापूर व परिसरातील शेकडो मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे.

Demand for declaring drought in Rajapur area | राजापूर परिसरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राजापूर परिसरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Next
ठळक मुद्दे दूष्काळचे रोजगार हमीचे कामे सूरू करावे अशी मागणी

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील खरिपाची पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी ती पिके आता काढणीस सुरूवात केली आहे. खरीप पिके हे थोडया फार प्रमाणात आलेले पावसावर शेतकºयांनी खरीपाची पेरणी केली होती. परंतु वरूणराजाचे आगमन न झाल्याने खरीपाची संपूर्ण पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना कामे नाही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूर व तालुक्यातील पूर्वेकडील भागात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच राजापूर व परिसरातील शेकडो मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. पावसाळा हा कोरडाच गेला आहे, त्यामुळे येणाºया काळात सर्वांना दुष्काळाचे चटके सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाज हा समाधान कारक पाऊस पडेल असा होता. या आशेवर बळीराजाने खरीपाची पेरणी केली. कपाशी, बाजरी, भूईमूग,सोयाबीन ,मका, या खिरपाची पेरणी केली होती. राजापूर व पूवेंकडील भाग हा पांढºया सान्याचा भाग म्हणून ओळखला जातो. कपाशी, मका बाजरी या पिंकाची पावसाअभावी वाढ न झाल्याने बळीराजावर जनावरांना चारा टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अजून असा-तसा एक महिना जनावरांना शेतातील बांधाला असलेले गवत आहे.
शेतकºयांनी उधारीतून घेतलेली बियाणे व खतांचे पैसे फेडताना शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरीपाची संपूर्ण पिके गेलेली आहे, उत्पादन राजापूर येथील शेतकºयांना काहीच निघणार नाही. यामूळे बळीराजाला आपला उदरनिर्वाह कसा करावा अशा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पशूधन कसे पाळावेत व त्यांना चारा व पाणी कूठून आणावे या भितीने शेतकरी कवडीमोल भावात आपले पशूधन विकत आहे. शेतकºयांच्या हातात येणारे उत्पन्न हे निसर्गाने हिरावून घेतले आहे. राजापूर येथील विहीरी व बंधारे कोरड्या ठाक आहेत. संपूर्ण पावसाळा गेला तरीही राजापूर येथे वाडया, वस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सूरू आहे. त्यामुळे शासनाने राजापूर व परिसरातील पूवेंकडील भागात दूष्काळ जाहीर करून दूष्काळचे रोजगार हमीचे कामे सूरू करावे अशी मागणी राजापूर व परिसरातील शेतकºयांनी केली आहे.
 

Web Title: Demand for declaring drought in Rajapur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.