हॉटेल मालकाकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:29 PM2018-11-20T17:29:07+5:302018-11-20T17:29:37+5:30

नाशिक : भाडेतत्त्वावर घेतलेले हॉटेल खाली करून न देता याउलट मालकाकडेच १५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित शेखर रमेश देवरे (रा. मालवणी हॉटेल, बारदान फाटा) याच्या विरोधात गंगापूर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़

 Demand for 15 lakh rupees for hotel owner's ransom | हॉटेल मालकाकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी

हॉटेल मालकाकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी

Next
ठळक मुद्दे हॉटेल खाली करून न देता मालकाकडेच १५ लाखांची खंडणी ; गुन्हा दाखल

नाशिक : भाडेतत्त्वावर घेतलेले हॉटेल खाली करून न देता याउलट मालकाकडेच १५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित शेखर रमेश देवरे (रा. मालवणी हॉटेल, बारदान फाटा) याच्या विरोधात गंगापूर पोलिसांनीखंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र यशवंत विंचू (रा़ शिवपूजा सोसायटी, लोकमान्यनगर, गंगापूररोड) यांचे गंगापूर रोडवरील बारदान फाट्याजवळ मालवणी हॉटेल आहे़ त्यांनी हे हॉटेल संशयित देवरे यास २० जानेवारी २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले होते़ मात्र, हॉटेलचे भाडे न देता देवरे नुकसान केल्याने विंचू यांनी हॉटेलची जागा खाली करण्यास सांगितली़ यावर देवरे याने हॉटेलची जागा खाली न करता उलट त्यांच्याकडे जागा खाली करायची असेल, तर १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली़ तसेच हॉटेलमध्ये आल्यास हातपाय तोडण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी हॉटेलमालक जितेंद्र विंचू यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून खंडणीची फिर्याद दिली़

Web Title:  Demand for 15 lakh rupees for hotel owner's ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.