इस्लामचे अंतिम प्रेषित पैगंबर जयंतीनिमित्त सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 01:19 AM2018-11-20T01:19:39+5:302018-11-20T01:20:13+5:30

इस्लामचे अंतिम प्रेषित व मानवतेचे पुरस्कर्ते हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात साजरी होत आहे. सर्वत्र सजावटीची लगबग पहावयास मिळत असून, मशिदी विद्युत रोषणाईने नटल्या आहेत.

Decoration on the last Prophet Muhammad's birth anniversary | इस्लामचे अंतिम प्रेषित पैगंबर जयंतीनिमित्त सजावट

इस्लामचे अंतिम प्रेषित पैगंबर जयंतीनिमित्त सजावट

Next

नाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित व मानवतेचे पुरस्कर्ते हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात साजरी होत आहे. सर्वत्र सजावटीची लगबग पहावयास मिळत असून, मशिदी विद्युत रोषणाईने नटल्या आहेत. बुधवारी (दि.२१) पारंपरिक ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक जुने नाशिकमधून काढण्यात येणार आहे.
पैगंबर जयंतीनिमित्त शासकीय सुटी मंगळवारी (दि.२०) जाहीर करण्यात आली असली तरी इस्लामी कालगणनेचा उर्दू महिना रबीऊल अव्वलचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.९) घडल्यामुळे ईद-ए-मिलाद एक दिवस पुढे ढकलली गेली. उर्दू महिन्याच्या १२ तारखेनुसार बुधवारी शहरात ईद-ए-मिलाद साजरी करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह सर्व धर्मगुरूंच्या बैठकीत घेतला गेला. त्यानुसार मागील शुक्रवारी खतीब सर्व मशिदींमधून जाहीर पत्रक पाठवून समाजबांधवांपर्यंत माहिती पोहचविली. त्यानुसार समाजबांधवांनी जयंतीच्या तयारीला सुरुवात केली. जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सातपूर आदी मुस्लीम बहुल परिसरात जयंतीचा उत्साह पहावयास मिळत आहे. या भागातील विविध सामाजिक मित्रमंडळांसह धार्मिक संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या परिसरात आकर्षक सजावट के ली जात आहे. तसेच पैगंबरांच्या ‘मदिना शरीफ’च्या प्रतिकृतीसह आकर्षक होर्डिंग्जची उभारणी करण्यावर भर दिला जात आहे.

Web Title: Decoration on the last Prophet Muhammad's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.