शाळेस कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

By Admin | Published: December 21, 2014 12:18 AM2014-12-21T00:18:52+5:302014-12-21T00:52:51+5:30

शाळेस कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

The decision of the villagers to lock the school | शाळेस कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

शाळेस कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

googlenewsNext

टेहरे : वर्षभरापासून मुख्याध्यापकपद रिक्तटेहरे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. येत्या दोन दिवसांत त्वरित मुख्याध्यापक न नेमल्यास शाळेला कुलूप लावण्यात येईल, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती सरपंच दत्तात्रेय पाटील यांनी दिली.
गेल्या एक वर्षापासून टेहरे जि. प. शाळेला मुख्याध्यापक नाही. वरिष्ठ शिक्षकांकडे या पदाचा भार असून, पद रिक्त असल्यामुळे एका वर्गाला शिक्षक नाही. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एका शिक्षकाला सतत बैठका, कागदपत्र पोहोचवणे यासाठी आपला वेळ खर्च करावा लागतो. परिणामत: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांना वेळोवेळी निवेदन दिले असून, अजून मुख्याध्यापक मिळत नाही. त्यामुळे येत्या आठवड्यात शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. अशी माहिती सरपंच पाटील व तंटामुक्तीचे उपाध्यक्ष प्रशांत शेवाळे यांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: The decision of the villagers to lock the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.