हिवाळी अधिवेशनावर धडकणार समृद्धी बधितांचा मोर्चा, संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 03:59 PM2017-12-16T15:59:36+5:302017-12-16T16:00:15+5:30

घोटी - प्रस्तावित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल संभ्रम असून अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त २६ टक्के जमीन थेट खरेदीद्वारे संपादन केली असल्याची माहिती दिली आहे. यावरून समृद्धी महामार्गास विरोध मावळला हा सरकारचा दावा फोल ठरला आहे. शेतकरी विरोधावर ठाम असुन येत्या १९ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण महाराष्ट्रातुन मोर्चा काढण्यात येणार आहे.

Decision on the meeting of the Sangh Samiti, the campaign for the prosperity of the victims of the prosperity of the winter session | हिवाळी अधिवेशनावर धडकणार समृद्धी बधितांचा मोर्चा, संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

हिवाळी अधिवेशनावर धडकणार समृद्धी बधितांचा मोर्चा, संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

googlenewsNext

घोटी - प्रस्तावित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल संभ्रम असून अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त
२६ टक्के जमीन थेट खरेदीद्वारे संपादन केली असल्याची माहिती दिली आहे. यावरून समृद्धी महामार्गास विरोध मावळला हा सरकारचा दावा फोल ठरला आहे. शेतकरी विरोधावर ठाम असुन येत्या १९ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण महाराष्ट्रातुन मोर्चा काढण्यात येणार आहे.
येणाºया काळात लढ्याचं नियोजन करण्यासंदर्भात इगतपुरी तालुका समृध्दी बाधित संघर्ष समितीची बैठक घोटी येथे राजाराम साळवी मंगल कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी लक्ष्मण तात्या गव्हाणे होते. तालुक्यातील शेतकºयांवर सध्या दबावतंत्राचा वापर शासन करत आहे व शेतकºयांचं नेतृत्व करणारेच सध्या दलाली करत आहेत, परंतु शेतकरी कोणालाही भीक न घालता एकजूटीने यावर मात करून सरकारला नमतं घेण्यास भाग पाडू असे गव्हाणे यांनी यावेळी सूचित केले. या बैठकीस कृती समितीचे अध्यक्ष भास्कर गुंजाळ,अरु ण गायकर,दौलत दुभाषे,ज्ञानेश्वर तोकडे,विष्णु वाखचौरे,सुरेश कडु,रामेश्वर शिंदे शिवाजी भोसले,सोमनाथ तातळे,राजेंद्र भटाटे,गोरख दुभाषे,भाऊसाहेब गुंजाळ,भागवत गुंजाळ,मुकुंद कडु,मधुकर दालभगत, लालू तातळे आदी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Decision on the meeting of the Sangh Samiti, the campaign for the prosperity of the victims of the prosperity of the winter session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक