चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू : मदतीसाठी धावला; पण दुर्दैवाने प्राणाला मुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 05:43 PM2019-03-03T17:43:25+5:302019-03-03T17:45:25+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील भुयारी गटारीच्या चेंबरच्या स्वच्छतेचे काम एका खासगी ठेकेदाराकडूून रविवारी (दि.३) सुरू करण्यात ...

Dead in the chamber: died for help; But unfortunately, the death is unfortunately | चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू : मदतीसाठी धावला; पण दुर्दैवाने प्राणाला मुकला

चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू : मदतीसाठी धावला; पण दुर्दैवाने प्राणाला मुकला

Next
ठळक मुद्देसोयीसुविधा सफाई कामगारांना पुरविण्यात आलेली नव्हती. सफाई कामगाराला बाहेर काढण्यास मदत केली

नाशिक : जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील भुयारी गटारीच्या चेंबरच्या स्वच्छतेचे काम एका खासगी ठेकेदाराकडूून रविवारी (दि.३) सुरू करण्यात आले. यावेळी दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील एका चेंबरमध्ये एक सफाई कामगार उतरला; दरम्यान त्याला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच दुसरा साथीदार चेंबरमध्ये उतरला; मात्र विषारी वायूमुळे त्याचाही श्वास गुदमरला आणि दोघे अडकले; दरम्यान, अग्निशामक दलाला घटनेची माहिती कळविण्यात आली. जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून एकास जीवंत बाहेर काढले; मात्र मदतीसाठी धावलेल्या अशोक रामपसे (४५, अवधुतवाडी, पंचवटी) या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजी स्टेडिअममध्ये यशवंत व्यायामशाळेच्या संरक्षण भिंतीलगत चेंबर आहे. सदरील चेंबरच्या साफसफाईसाठी पप्पू सकट या ठेकेदारास त्याची सफाई कामे करणारी चार-पाच सफाई कामगार आले होते. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक सफाई कामगार चेंबरचा ढापा काढून आत उतरला असता, आतील विषारी वायुमुळे त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यास बाहेर काढण्यासाठी अशोक रामपसे यास आत उतविण्यात आले. त्याने आधी उतरलेल्या सफाई कामगाराला बाहेर काढण्यास मदत केली. परंतु, तोपर्यंत अशोक रामपसे  त्याचा चेंबरमध्ये विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यु झाला. तातडीने त्यास रु ग्णवाहिकेतून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकाराची सोयीसुविधा सफाई कामगारांना पुरविण्यात आलेली नव्हती. तर, जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालयाने सदरचे काम करण्यास ठेकेदार पप्पू सकट यास सांगितले होते. तर, आता जिल्हा क्रडा कार्यालयाने कानावर हात ठेवले आहे. सदरच्या घटनेनंतर मृत अशोक रामपसे याच्या नातलगांनी जिल्हा रु ग्णालयात गर्दी केली होती.

Web Title: Dead in the chamber: died for help; But unfortunately, the death is unfortunately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.