संगणक परिचालकांचे थकित मानधनासाठी कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:27 PM2018-09-26T13:27:59+5:302018-09-26T14:18:57+5:30

देवगाव - शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू असून त्या ठिकाणी संगणक परिचालक काम करीत आहे.परंतु कंपनीच्या मनमानी व चुकीच्या धोरणामुळे ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालकांचे काम करूनही सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गटविकास अधिकारी संदीप कराड यांना निवेदन देऊन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

 Curved movement for tired value of computer operators | संगणक परिचालकांचे थकित मानधनासाठी कामबंद आंदोलन

संगणक परिचालकांचे थकित मानधनासाठी कामबंद आंदोलन

Next

देवगाव - शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू असून त्या ठिकाणी संगणक परिचालक काम करीत आहे.परंतु कंपनीच्या मनमानी व चुकीच्या धोरणामुळे ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालकांचे काम करूनही सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गटविकास अधिकारी संदीप कराड यांना निवेदन देऊन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. सहा हजार रूपये या तुटपुंज्या मानधनावर केंद्रचालक ग्रामपंचायतींमध्ये काम करीत आहेत ते मानधनही वेळेवर मिळत नाही. कधी हजार कधी दोन हजार तर तीन हजार रूपये खात्यावर पाठवून बोळवण केली जाते. त्यामुळे संगणक परिचालक मेटाकुटीला आले आहे.शासनाने २०१६ मध्ये आपले सरकार सेवा केंद्राची संकल्पना आमलात आणली. त्याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत एक केंद्रचालक तर काही ठिकाणी एकाच चालकाला दोन-तीन ग्रामपंचायत काम करावे.पंरतु कामानुसार मोबदला मिळत नाही. चौदा वित्त आयोगाच्या निधीतून केंद्र चालकांचे मानधन व संगणक देखभाल दुरु स्तीचा खर्च भागविला जातो. त्यानुसार कंपनीला ग्रामपंचायत मार्फत धनादेश देऊनही कंपनी वेळेत मानधन अदा करत नाही. मानधन वेळेवर मिळण्यासाठी संगणक परिचालकांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे.परंतु शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे संगणक परिचालकांचे मानधनही मिळत नाही आण िईतर मागण्यांचा प्रश्नही प्रलंबित राहिला आहे. या प्रसंगी तालुका अध्यक्ष तुषार पानगव्हाणे, सुरेश जाधव, प्रविण मोरे,वंसत शिरसागर,महेश कापसे, अक्षय सानप,रविराज पातळे,सुनिलजुग्रुत,उमरफारु क काद्री,राजु रोटे,भगवान तासकर,नाना पवार,प्रकाश मोरे,विकी बेलेकर, भाऊसाहेब तासकर साधना निकम,माधुरी खोडे आदी संगणक परिचालक उपस्थित होते.

Web Title:  Curved movement for tired value of computer operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक