खरीप हंगामावर वक्र दृष्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:02 AM2018-07-02T01:02:23+5:302018-07-02T01:08:53+5:30

मालेगाव : पावसाअभावी तालुक्यातील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. कोरडवाहू क्षेत्रावरील हंगाम धोक्यात आला आहे. तालुक्यातील ६६ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर केवळ १६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर कापूस व बाजरी पिकांची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Curve sight on Kharif season! | खरीप हंगामावर वक्र दृष्टी!

खरीप हंगामावर वक्र दृष्टी!

Next
ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षामालेगाव तालुक्यात ६६ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

अतुल शेवाळे ।
मालेगाव : पावसाअभावी तालुक्यातील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. कोरडवाहू क्षेत्रावरील
हंगाम धोक्यात आला आहे. तालुक्यातील ६६ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर केवळ १६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर कापूस व बाजरी पिकांची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जून महिना उलटूनही तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. गेल्या काही वर्षांपासून पाऊस वेळेवर येत नसल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून पडत आहेत. जून महिना उलटूनही पावसाचा मागमूस नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.
बी-बियाणे, रासायनिक खतांची खरेदी करण्यात आली आहे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. तालुक्यात केवळ ८४.३७ टक्के पाऊस पर्जन्य झाले आहे. कृषी विभागाने ८२ हजार ८७७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे तर ३३ हजार ३७४ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे काही भागात पेरण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील १६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. यात काटवन व माळमाथा भागातील १२ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. तर ३ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी पिकाची लागवड करण्यात आली आहे.
सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पेरणी केलेली पिकेही धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
१४ लाख रोपांची होणार लागवड
१ रविवारपासून (दि. १) वनमहोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या वनमहोत्सवाची वनविभागाने जय्यत तयार केली आहे. राज्य शासनाने १३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मालेगाव वन उपविभागाच्या एक हजार २६९ हेक्टर क्षेत्रावर १४ लाख ६० हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. मालेगाव उपवनक्षेत्रात गेल्यावर्षी ९ लाख ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. उपविभागाच्या मालेगाव, बागलाण या दोन तालुक्यांचा समावेश आहे.
२ सटाणा व ताहाराबाद वनक्षेत्रात सर्वाधिक वृक्षलागवड केली जाणार आहे. मालेगाव हद्दीतील ४४७ हेक्टर क्षेत्रावर ५ लाख ११ हजार ७००, तर बागलाण वनक्षेत्रातील ८२२ हेक्टर क्षेत्रात ९ लाख ४ हजार ७०० रोपांची लागवड केली जाणार आहे. मालेगाव तालुक्यातील लुल्ले, वनपट, हाताणे तर बागलाणमधील हरणबारी, दोधेश्वर, केळझर, ब्राह्मणगाव, जोखड या वाटिकांमध्ये रोपे तयार करण्यात आली आहेत.
३ स्थानिक मजुरांमार्फत १४ लाख ७ हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. उपविभागात अंजन व कडूलिंबाची झाडे जास्त प्रमाणात आहेत. याबरोबरच करंजखैर, महारूख, बांबू, आवळा, सीताफळ आदी झाडे लावली जाणार आहेत. मालेगाव महसूल विभागांतर्गत प्रत्येक तलाठी कार्यालय आवार मंडळ अधिकारी यांना प्रत्येकी ९ तर प्रांताधिकारी व तहसील कार्यालय आवारात प्रत्येकी पाच या प्रमाणे रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
सातही लघु प्रकल्प कोरडेठाक
 तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. जून महिना उलटूनही पावसाचा मागमूस दिसत नाही. परिणामी तालुक्यातील लघु प्रकल्पातील मृत साठाही आटला आहे.
झाडी, दहिकुटे, साकुर, लुल्ले, अजंग, बोरीअंबेदरी, दुंधे हे लघुप्रकल्प कोरडेठाक आहेत. या प्रकल्पांवरून शेती सिंचनाला व पिण्याचे पाणी वापरले जाते.
बोरी अंबेदरी धरणावरील माळमाथा पाणीपुरवठा योजनाही कोलमडून पडली आहे. या भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोर जावे लागत आहे.
१ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी खड्ड्यांचे जिओ टॅगिंग केले आहे. ही माहिती शासनाकडे संरक्षित असणार आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन वृक्षारोपण करावे.
- जगदीश येडलावार, उपविभागीय वनअधिकारी
जमिनीत पाण्याची ओल, वाफ चांगली असल्यावरच मका पिकाची पेरणी करावी. बी-बियाणे खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्यांकडून पक्की पावती घ्यावी.
- गोकुळ अहिरे,
तालुका कृषी अधिकारी

Web Title: Curve sight on Kharif season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक