ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:42 PM2019-03-07T18:42:45+5:302019-03-07T18:44:22+5:30

इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या तिसर्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली. थेट सरपंच पदासठी गुरूवार अखेर ९ तर सदस्यपदासाठी १० अर्ज दाखल झाले. अमावस्या असल्याने गेल्या दोन दिवसात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरणे टाळले. गुरू वारी मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गर्दी झाली

The crowd for filing nominations for the election of Gram Panchayats | ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

googlenewsNext

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या तिसर्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली. थेट सरपंच पदासठी गुरूवार अखेर ९ तर सदस्यपदासाठी १० अर्ज दाखल झाले. अमावस्या असल्याने गेल्या दोन दिवसात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरणे टाळले. गुरू वारी मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गर्दी झाली. मात्र कागदपत्रांची जमवाजमव आ िण संगणकावर अर्ज भरण्यासाठी वेळ कमी पडल्याने अत्यल्प संख्येने अर्ज दाखल झाले. उद्या आणि परवा अधिक गर्दी होणार असल्याचे संकेत आहेत.
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुº्हे, समनेरे, पाडळी देशमुख, नांदूरवैद्य, मालुंजे, मुरंबी, कावनई, कांचनगाव, पिंपळगाव मोर, अधरवड, पिंपळगाव भटाटा, मायदरा धानोशी, इंदोरे, धामणी, देवळे, उभाडे, सोनोशी, म्हसुर्ली, आहुर्ली, धार्नोली, कोरपगाव, रायांबे, शेवगेडांग, खैरगाव, खडकेद, बारशिंगवे, वाकी, बोरटेंभे, शेणवड बुद्रुक, मांजरगाव या ३० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे.
३०ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नवीन तहसील कार्यालयाजवळील नव्या प्रशासकीय इमारतीत कामकाज सुरू आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३० निवडणूक निर्णय अधिकाº्यांची नेमणूक करण्यात आलेली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आले होते. आजअखेर थेट सरपंच पदासाठी९ तर सदस्य पदासाठी फक्त१० अर्ज दाखल झाले. उद्या आणि परवा विक्र मी संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले आहे.
निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर ग्रामीण भागात व्युव्हरचनेला आजपासून वेग येणार आहे. सर्व पक्षांच्या पदाधिकार्यांनी या निवडणुकीत लक्ष घातले असल्याने निवडणूक रंगतदार होईल अशी चिन्हे आहेत.
४निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात ९ मार्चला सकाळी ११ वाजता इगतपुरी तहसील कार्यालयात कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी केले आहे.

Web Title: The crowd for filing nominations for the election of Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.