त्र्यंबकला सुट्यांमुळे भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:37 AM2018-11-12T01:37:58+5:302018-11-12T01:38:34+5:30

दीपावली व सलग असलेल्या सुट्यांमुळे भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली आहे. झटपट दर्शन घेण्याकरिता असलेल्या २०० रुपये तिकिटाच्या योजनेतून दर्शनालाही किमान दोन तास लागत होते. यावरून गर्दीची कल्पना येते.

The crowd of devotees due to Trimbalakas | त्र्यंबकला सुट्यांमुळे भाविकांची गर्दी

त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरावर आगामी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई. या रोषणाईमुळे मंदिर तसेच परिसर रात्रीच्या वेळी अतिशय आकर्षक दिसत आहे.

Next

त्र्यंबकेश्वर : दीपावली व सलग असलेल्या सुट्यांमुळे भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली आहे. झटपट दर्शन घेण्याकरिता असलेल्या २०० रुपये तिकिटाच्या योजनेतून दर्शनालाही किमान दोन तास लागत होते. यावरून गर्दीची कल्पना येते.
गेल्या आठवड्यापासून दीपावलीची धामधूम सुरू होती. या काळात त्र्यंबकेश्वरला गर्दी रोडावली होती. भाविक येत होते, पण नेहमीच्या तुलनेत म्हणावी अशी गर्दी नव्हती. सुट्यांमुळे सध्या प्रचंड गर्दी होत आहे. गावातील हॉटेल, प्रसाद, वाण, भेटवस्तू, देवाच्या मूर्ती आदी व्यावसायिकांच्या दुकानातदेखील गर्दी दिसत आहे. सध्या पूर्व दरवाजाने दर्शनव्यवस्था सुरू आहे. या ठिकाणी भव्य मंडप (उन्हाळी शामियाना) देवस्थान ट्रस्टने उभारला आहे. सध्या सर्व रांगा फुल्ल होत आहेत. सोमवारी भगवान त्र्यंबकराजाची पालखी निघणार असल्याने गर्दी असतेच.
त्र्यंबकेश्वर मंदिरासह कुशावर्त तीर्थ, निवृत्तिनाथ मंदिर, गंगाद्वार, ब्रह्मगिरी पर्वत आदी ठिकाणी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे गाइड, रिक्षाचालक आदींचे व्यवसाय बहरले आहेत.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेभाविकांची दर्शनव्यवस्था नियोजनबद्ध केल्याने भाविकांना शांततेत दर्शन घेता येते. सध्या तरी मंदिरात भांडणे, हाणामारीच्या घटना पाहण्यात आलेल्या नाहीत.

 

Web Title: The crowd of devotees due to Trimbalakas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.