उन्हामुळे द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:37 PM2019-04-23T14:37:42+5:302019-04-23T14:37:56+5:30

वनसगांव : द्राक्ष हंगाम संपत आला असून छाटणीची सुरूवात जोरात सुरु आहे. मात्र उन्हाची तिव्रता अधिक असल्याने छाटलेली द्राक्षबाग फुटण्यास मोठ्या प्रमाणात अङचण येत आहे तर थोङ्या फार प्रमाणात फुटलेल्या कोवळ्या द्राक्ष पानांना उन्हाचा तडाखा अधिक बसत आहे.

 In the crisis of grape due to summer | उन्हामुळे द्राक्षबागा संकटात

उन्हामुळे द्राक्षबागा संकटात

Next

वनसगांव : द्राक्ष हंगाम संपत आला असून छाटणीची सुरूवात जोरात सुरु आहे. मात्र उन्हाची तिव्रता अधिक असल्याने छाटलेली द्राक्षबाग फुटण्यास मोठ्या प्रमाणात अङचण येत आहे तर थोङ्या फार प्रमाणात फुटलेल्या कोवळ्या द्राक्ष पानांना उन्हाचा तडाखा अधिक बसत आहे. झाडावरची पाने सुकुन आपोआप जमिनीवर पङत असून शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत सापडला आहे.यंदाचा उन्हाळा अधिक तिव्र असून याचा फटका द्राक्ष बागांना बसत आहे चालु हंगामात द्राक्ष काडी तयार झाली नाही तर पुढील वर्षी द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात घेता येणार नाही.
द्राक्ष बागेची फुट होण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर दिवसातुन दोन वेळा पाणी स्प्रेद्ववारे फवारणी करावी, जेणेकरु न येणाºया पिकावर कुठलाही परिणाम होणार नाही व द्राक्ष फुटवणी मोठ्या प्रमाणात होईल. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात युरीयाची फवारणी केल्यास द्राक्ष बागेस मोठ्या प्रमाणात योग्य फायदा होऊ शकतो व द्राक्ष बागेची काडी व फुट चांगली होऊ शकते. त्याचप्रमाणे बागेला पाण्याचे नियोजन करतांना द्राक्ष बागेला शक्यतो सकाळी किवा सायंकाळी ठिबक सिंचनने पाणी पुरवठा केल्यास बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होऊन जास्तीत जास्त पाणी द्राक्ष बागेस मिळेल. द्राक्ष बाग मोठ्या प्रमाणात अनुकुल वातावरण मिळेल असे काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title:  In the crisis of grape due to summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक