पहिली, आठवी, दहावीचा बदलणार अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:19 AM2018-02-17T01:19:16+5:302018-02-17T01:19:40+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा व हवाहवासा वाटणारा अभ्यासक्रम येऊ घातला असून, त्या धर्तीवर पाठ्यपुस्तकांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिलीसह आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तक पडणार आहे.

 Courses to change the first, eighth and tenth standard | पहिली, आठवी, दहावीचा बदलणार अभ्यासक्रम

पहिली, आठवी, दहावीचा बदलणार अभ्यासक्रम

googlenewsNext

पेठ : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा व हवाहवासा वाटणारा अभ्यासक्रम येऊ घातला असून, त्या धर्तीवर पाठ्यपुस्तकांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिलीसह आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तक पडणार आहे.  शालेय अभ्यासक्रमामध्ये नावीन्यता, विविध तंत्रज्ञान, अ‍ॅक्टिबेस लर्निंग, डिजिटीलायझेशन आणि घोकंपट्टी जाऊन उपक्रमशीलता, शालेय मूल्य व स्वयंअध्ययनाची सवय जोपासली जावी यासाठी आता यंदा इयत्ता आठवी आणि दहावीप्रमाणेच पहिलीचेही पाठ्यपुस्तक नव्याने तयार करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षातच (२०१८-१९) त्यानुसार आठवी आणि दहावीबरोबरच पहिलीची नवी पाठ्यपुस्तके बाजारात येणार आहेत, तर पुढील वर्षी दुसरी, तिसरी आणि अकरावीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत.  राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती पूर्ण होते, तोच हे नवे धडे गिरवले जात आहेत. राज्यात २०१२ मध्ये तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखड्यानुसार २०१३ पासून नवी पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली. दरवर्षी टप्प्याटप्प्याने एकेका इयत्तेचे पुस्तक बदलण्यात आले. त्यानुसार यंदा आठवी आणि दहावीची नवी पुस्तके लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला.  मात्र त्याचबरोबर आता यंदाच पहिलीचेही पुस्तक बदलण्यात
येणार आहे. सध्या असलेली पहिलीची पुस्तक २०१३ मध्ये प्रकाशित झाली होती. त्यात काही बदल करून २०१६ मध्ये पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले. अभ्यासक्रम आराखड्यानुसार सर्व पुस्तके लागू होण्यापूर्वीच यंदापासून पहिलीचे पुस्तक बदलून पाठ्यपुस्तके बदलण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.  पुढील वर्षी (२०१९) इयत्ता दुसरी, तिसरी व अकरावीची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती केंद्राकडून (बालभारती) पाठ्यपुस्तक विक्रे त्यांना जुनी पुस्तके बदण्याची विनंती करणारे पत्र बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी पाठविले आहे. जुनी पुस्तके बालभारतीकडे जमा करण्याच्या सूचनाही वितरक व दुकानदारांना करण्यात आल्या आहेत.
एप्रिल २०१६ मध्ये पूर्वीच्या सरकारच्या कालावधीत तयार करण्यात आलेले सर्व अभ्यास मंडळे बरखास्त करत एकाच अभ्यास मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याबरोबर २०१६ मध्ये बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम काढून ते विद्या प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले. त्यानंतर पाचवीपासूनची पुस्तके ही नव्या अभ्यास मंडळाकडून तयार करण्यात आली होती. गेल्या वर्षी अभ्यास मंडळात बदल करत काही सदस्यांना काढून नवीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली.
आगामी शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचे धोरण महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांनी केले असून, भविष्यकाळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकात क्यूआर कोडचा उपयोग करण्यात येणार असल्याने शिक्षकांना प्रोजेक्टच्या माध्यमातून अधिक प्रभावी अध्यापन करणे शक्य होणार आहे. म्हणून राज्यातील प्रत्येक शिक्षकाने टेक्नोसेव्ही होण्याची गरज आहे.  - डॉ. सुनील मगर, संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, मुंबई

Web Title:  Courses to change the first, eighth and tenth standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा