पीडितांच्या सेवेसाठी योगदान द्यावे : भरत वाटवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:43 AM2019-06-11T01:43:11+5:302019-06-11T01:44:27+5:30

भारतात सध्या चार लाखांहून अधिक मनोरुग्ण रस्त्यावर फिरत आहेत, त्यापैकी केवळ सात हजार रुग्णांचे श्रद्धाच्या माध्यमातून पुनर्वसन होऊ शकले आहे. अशाप्रक ारे समाजातील वेगवेगळ्या घटकांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे.

 Contribute to the service of victims: Bharat Bhavani | पीडितांच्या सेवेसाठी योगदान द्यावे : भरत वाटवानी

पीडितांच्या सेवेसाठी योगदान द्यावे : भरत वाटवानी

Next

नाशिक : भारतात सध्या चार लाखांहून अधिक मनोरुग्ण रस्त्यावर फिरत आहेत, त्यापैकी केवळ सात हजार रुग्णांचे श्रद्धाच्या माध्यमातून पुनर्वसन होऊ शकले आहे. अशाप्रक ारे समाजातील वेगवेगळ्या घटकांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे आरोग्यासह वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी आणि पीडितांच्या सेवेसाठी सामूहिक प्रयत्नांसोबतच प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर आपल्याला शक्य ते काम करण्याची गरज आहे. सर्वांनी आपल्यासमोर येणाऱ्या पीडितांची सेवाभावनेतून शक्य त्या मदतीसाठी योगदान दिले तर देशाचे भविष्यातील चित्र निश्चितच बदलेले असेल असा आशावाद हजारो मनोरुग्णांचे पुनर्वसन करणारे डॉ. भरत वाटवानी यांनी केले.
महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त आयुर्वेद विद्याशाखेतील वैद्य सुभाष भालचंद्र रानडे व भालचंद्र कृष्णाजी भागवत यांना सोमवारी (दि.१०) जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू दिलीप म्हैसेकर यांच्यासह व्यासपीठावर डॉ.सुरेश पाटनकर, डॉ. अजित गोपचडे, डॉ. श्रीराम शेवरीकर आदी उपस्थित होते. डॉ. भरत वाटवाणी यांनी मानसिक आजार असलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाचे कार्य करण्याची प्रेरणा समाजसेवक बाबा आमटे व प्रकाश आमटे यांच्याकडून मिळाल्याचे नमूद करीत त्यातूनच श्रद्धा फाउंडेशनची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले.
मनोरुग्ण पुनर्वसन कार्यात दहीसर ते कर्जतपर्यंतचा संघर्षमयी प्रवास उलगडतांना इतरांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठीच आपण रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले, तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून अभ्यासक्रम, परीक्षा,पद्धती आणि निकाल यंत्रणा आधुनिक केली असून, विद्यापीठ आरोग्य संघटनेने यावर्षासाठी जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी, सर्व ठिकाणी आरोग्य सेवा’ प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचे व योगाचे महत्त्व संपूर्ण विश्वाने मान्य केल्याचे डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले. प्रास्तविक प्रति कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी केले. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी आभार मानले.
एम श्री सरणला चार सुवर्ण
वर्धापन सोहळ्यात विद्यापीठातील विविध विद्याशाखांमधून सुवर्णपदक विजेत्या ४१ विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यात आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे येथील एम श्री सरण याने सर्वाधिक चार सुवर्णपदक पटकावले आहे, तर रोहन पै (पुणे), कृष्णा अग्रवाल (मुंबई), हरिस्ता शेट्टी (पुणे), कीर्ती गायकवाड (मुंबई), धनश्री पाटील (कोल्हापूर) यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके पटकावली. तसेच अमेय माचवे, रश्मी कारवा, आदीनाथ पाटील, अर्शिया चौधरी, सिद्धी सांगलीकर, शंतनू खन्ना, ओमकार कारेकर, रेहा गंधम, सकिना रामपुरी, निरजा अय्यर, प्राजक्ता वायकर, आदिती सुळे, वर्षा पठारे, सादिया पिंजारी, चित्रा गलांडे, श्रृती कुलकर्णी, मनीषा पोपाली, मानसी नेवगे, देढिया देऊल, आशिका शहा, वैष्णवी शहाणे, झरिन शेख, भगीरथ जना, श्रृतिका रणदिवे, विभुती सारंगी, ई. के. हरिथा, मुरील फर्नांडीस, निभा कुमारी, एन. शोभना, खुशाली शहा, मनाली शहा यांनी सुवर्णपदक पटकावले.
उत्कृष्ट क्रीडा विद्यार्थी पुरस्कार
४क्रीडा विभागात अमरावतीच्या पंजाबराव देशमुख वैद्यकीय विद्यालयातील प्रवीणा काळे, विदर्भ दंत महाविद्यालयातील रक्षा जाजू, मीरज येथील गुलाबराव पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या, अमरावती रेश्मा भुसार, कोल्हापूरच्या आयुर्वेद महाविद्यालयातील शिवम बारहत्ते व नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आॅफ नर्सिंगच्या ज्ञानेश्वर मुसळे यांना उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्टÑीय सेवा योजना पुरस्कार
४राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत उल्लेखनीय योगदानासाठी नाशिकच्या मोतिवाला होमिओपॅथी महाविद्यालयाचे डॉ. स्वानंद शुक्ला यांना उत्कृष्ट अधिकारी, तर मोतीवाला मेडिकल क ॉलेजला उत्कृष्ट संस्था, पेठच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील आकाश देशमुख याला उत्कृष्ट स्वयंसेवक व पुण्याच्या आर्मफोर्सच्या परिचर्या महाविद्यालयातील कुमारी इंदू यांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.
क्रीडा शिष्यवृत्ती पुरस्कार
पुणे येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या शिखा मेनन, विदर्भ दंत महाविद्यालयातील रक्षा जाजू ,वायएमटी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील श्वेता शेरवेकर व नवी मुंबईच्या लोकमान्य टिळक फिजिओथेरपी महाविद्यालयातील मेधाली रेडकर यांना क्रीडा शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले.
४विद्यापीठ वर्धापन दिन सोहळ्यातील सुवर्णपदक विद्यार्थ्यांमध्ये मालेगाव येथील मोहम्मद्दिया तिब्बिया युनानी कॉलेजच्या मुबाशीरा मुहम्मद इरफान व आसमानाज मोमिन इकबाल यांनी, तर शहरातील मोतिवाला मेडिकल कॉलेजच्या प्राप्ती कालडा हिने सुवर्णपदक पटकावले आहे.

Web Title:  Contribute to the service of victims: Bharat Bhavani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.