Video: फोडाफोडीच्या राजकारणातून युतीत फ्री स्टाईल मारहाण, राष्ट्रवादीचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 12:44 PM2019-04-11T12:44:34+5:302019-04-11T12:48:07+5:30

भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली मारहाण यातून भाजपाला फोडाफोडीचं राजकारण अंगलट आल्याचं दिसतंय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपाला लगावला आहे. 

Congress NCP leaders criticized BJP on girish-mahajan assaulted incident | Video: फोडाफोडीच्या राजकारणातून युतीत फ्री स्टाईल मारहाण, राष्ट्रवादीचा टोला

Video: फोडाफोडीच्या राजकारणातून युतीत फ्री स्टाईल मारहाण, राष्ट्रवादीचा टोला

googlenewsNext

नाशिक - फोडाफोडीचं राजकारण भाजपाच्या अंगलट आलं आहे. अमळनेरमध्ये गिरीश महाजन यांना झालेली धक्काबुक्की आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली मारहाण यातून भाजपाला फोडाफोडीचं राजकारण अंगलट आल्याचं दिसतंय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपाला लगावला आहे. 

पक्षांतर्गत काही प्रश्न असतील तर ते पक्षश्रेष्ठींकडे मांडले पाहिजेत. काल झालेला प्रकार निंदणीय आहे अशाप्रकारे कोणीही कायदा हातात घेऊ नये, सर्वच राजकीय नेत्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. फोडाफोडीचं राजकारण किती झालं पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे. असंही छगन भुजबळ म्हणाले. 

तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही अमळनेरमध्ये भाजपाच्या व्यासपीठावर झालेल्या मारहाणीच्या प्रकारात भाष्य करत भाजपावर टीका केली आहे. सध्या ज्या गतीने गिरीश महाजन वाटचाल करत आहेत बहुदा त्यामुळे अशी परिस्थिती त्यांच्यावर आली असावी. काल भाजपाच्या जाहीर व्यासपीठावर घडलेला प्रकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत लांच्छानास्पद आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने परिसीमा ओलांडली आहे. अशी टीका थोरातांनी भाजपावर केली. 

तसेच काल घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओही जास्त वेळ पाहू वाटत नाही. गिरीश महाजन बारामतीत लढायला चालले होते. मात्र गावातच त्यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी फ्री स्टाईल मारहाण मिटवायची वेळ आली असा टोला बाळासाहेब थोरातांना गिरीश महाजनांना लगावला. 

काल अमळनेर येथील शिवसेना-भाजपाच्या मेळाव्यामध्ये जोरदार हाणामारी झाली होती. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केली, त्याच वेळी गिरीश महाजनांना धक्काबुक्की झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने पहिल्यांदा स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी ती रद्द करून त्यांच्याजागी आमदार उन्मेष पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. बी एस पाटील यांनी केलेल्या विरोधामुळेच स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द झाली हा राग मनात धरुन जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी भरव्यासपीठावर बी एस पाटील यांना मारहाण केली. 



 

Web Title: Congress NCP leaders criticized BJP on girish-mahajan assaulted incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.