अल्पसंख्याक समाजाकडून संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:42 AM2019-01-22T01:42:21+5:302019-01-22T01:42:48+5:30

गोवर-रुबेला लसीकरणासाठी शहरातील मुस्लीम बहुल भागात असलेल्या गैरसमजाविषयी महापालिकेने विविध संस्था आणि धर्मगुरू यांच्या माध्यमातून प्रबोधन केल्यानंतरदेखील शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला नाही.

 Composite response from minority communities | अल्पसंख्याक समाजाकडून संमिश्र प्रतिसाद

अल्पसंख्याक समाजाकडून संमिश्र प्रतिसाद

Next

नाशिक : गोवर-रुबेला लसीकरणासाठी शहरातील मुस्लीम बहुल भागात असलेल्या गैरसमजाविषयी महापालिकेने विविध संस्था आणि धर्मगुरू यांच्या माध्यमातून प्रबोधन केल्यानंतरदेखील शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला नाही. ९ हजार ७८९ मुलांपैकी ४,१०५ मुलांचे लसीकरण करण्यात आले असून, उर्वरित लसीकरणासाठी वैद्यकीय विभाग पाठपुरावा करणार आहे. दरम्यान, शहरात एकूण ८२ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने मोहिमेची मुदत २५ जानेवारीपर्यंत वाढवून दिली असून त्यामुळे ९० टक्के लसीकरण होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
राज्य शासनाने गोवर-रुबेला लसीकरणासाठी महापालिकेला दिलेले उद्दिष्ट ७४ टक्क्यांपर्यंतच अडकले होते, मात्र महापालिकेने मध्यंतरी मोहीम व्यापक केली. त्यातच अल्पसंख्याक समाजात विशेषत: मुस्लीम बहुल भागात असलेल्या गैरसमाजामुळे लसीकरणाला प्रतिसाद मिळत नव्हता. काही शाळांनी तर लसीकरणास थेट नकार दिला होता. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने गेल्या १४ जानेवारीस मुस्लीम समाजाचे धर्मगुरू, शिक्षण संस्था तसेच सेवाभावी संस्थांची बैठक घेतली आणि त्यांच्यातील गैरसमज दूर करून लसीकरणासाठी प्रबोधन करण्याचे आवाहन केले होते. गेल्या शुक्रवारी मशिदीत नमाज पठणाच्या वेळी आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी (दि.१९) मुस्लीम बहुल भागात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली. महापालिकेने लसीकरण न झालेल्या ९ हजार ७८९ लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते.
नाशिक महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर शहरातील १ हजार ६८९ बालरोग तज्ज्ञांचीदेखील मदत घेऊन त्यांच्या दवाखान्यात जाऊन महापालिकेने लसीकरण केले. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढला आहे.

Web Title:  Composite response from minority communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.