नाशिक मनपा हद्दीतील १०० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण

By Suyog.joshi | Published: February 3, 2024 10:25 AM2024-02-03T10:25:00+5:302024-02-03T10:25:10+5:30

गेल्या २३ जानेवारीपासून शासन आदेशानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणाचे काम युध्द पातळीवर सुरू होते.

Completed survey of 100 percent houses in Nashik municipal limits | नाशिक मनपा हद्दीतील १०० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण

नाशिक मनपा हद्दीतील १०० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण

नाशिक : मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार घरोघरी सर्वेक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. गेल्या २३ जानेवारीपासून शासन आदेशानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणाचे काम युध्द पातळीवर सुरू होते.

नाशिक शहरातील घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी मनपाच्या सुमारे दोन हजार ८०० अधिकारी व सेवकांनी काम केले. काम अपूर्ण राहिल्याने शासनाने दोन दिवस मुदत वाढ दिली होती. शासनाने दोन दिवसांची म्हणजे २ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली होती. सर्वेक्षणासाठी मोठ्यासंख्येने मनपाचे अधिकारी व सेवक फिल्डवर सहभागी झाले होते.

२३ जानेवारीपासून सुरु झालेल्या सर्वेक्षणात २९ जानेवारीपर्यंत शहरातील सुमारे ४ लाख ९० हजार घरांपैकी ३ लाख ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. यामध्ये नाशिक पूर्व विभागात सुमारे ७० हजार घरांचे सर्वेक्षण झाले होते तर नाशिक पश्चिम विभागात ३३ हजार, पंचवटीत ६६ हजार, सिडको विभागात ७७ हजार, नाशिकरोड विभागात ५० हजार तर सातपूर विभागात सुमारे ५३ हजार या प्रमाणे घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते.

Web Title: Completed survey of 100 percent houses in Nashik municipal limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.