बारा बटूंचे सामुदायिक व्रतबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:19 AM2019-05-16T00:19:32+5:302019-05-16T00:19:47+5:30

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे सामुदायिक व्रतबंध करण्यात आले. व्यासपीठावर शंकराचार्य मठाचे व्यवस्थापक रामगोपाल वर्मा, संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष अ‍ॅड. भानुदास शौचे, माधव भणगे, देणगीदार मिलिंद चिंधडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी एकूण १२ बटूंचे व्रतबंध करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याचे पौरोहित्य भालचंद्रशास्त्री शौचे, वेदमूर्ती पंडित वैभव दीक्षित, कौस्तुभ शौचे यांनी केले.

 Community Restraint of Twelve Dwarves | बारा बटूंचे सामुदायिक व्रतबंधन

बारा बटूंचे सामुदायिक व्रतबंधन

googlenewsNext

नाशिक : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे सामुदायिक व्रतबंध करण्यात आले. व्यासपीठावर शंकराचार्य मठाचे व्यवस्थापक रामगोपाल वर्मा, संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष अ‍ॅड. भानुदास शौचे, माधव भणगे, देणगीदार मिलिंद चिंधडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी एकूण १२ बटूंचे व्रतबंध करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याचे पौरोहित्य भालचंद्रशास्त्री शौचे, वेदमूर्ती पंडित वैभव दीक्षित, कौस्तुभ शौचे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेसाठी तन, मन, धनाने ज्यांनी सेवा अर्पण केली त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये रमेश अनंत देव, अविनाश दत्तात्रय पाराशरे, श्रीमती शैलजा शंकरराव दीक्षित यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सत्कारार्थींचा परिचय पं. वैभव दीक्षित, राजश्री शौचे, रत्नप्रभा गर्गे यांनी करून दिला. यावेळी रामगोपाल अय्यर यांच्या हस्ते श्री व सौ. मिलिंद चिंधडे यांनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी अय्यर यांनी संस्थेने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी संकल्प जोशी, अनुराग कोरडे, पार्थ भणगे, सोहम कोतवाल, श्रेयस जोशी, वल्लभ जोशी, गौरव कुलकर्णी, अक्षय ऋषिपाठक, यश रत्नपारखी, प्रथमेश कुलकर्णी, तनिष कुलकर्णी, अनिरुद्ध जाडकर यांच्यावर संस्कार करण्यात आले. संस्थेच्या वाटचालीस अनेक देणगीदारांनी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनिल नांदुर्डीकर, उदय जोशी, अवधूत कुलकर्णी, तुषार जोशी, सतीश बाल्टे, अजित कुलकर्णी, रोहिणी जोशी, मालती कुरूंभट्टी, महेंद्र गायधनी, प्रमोद मुळे, प्रकाश शुक्ल, डॉ. शरद जोशी, सुभाष भणगे, कुमार मुंगी, शांता गजानन, अनिता कुलकर्णी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात किरण जोशी यांनी बटुंना गायत्रीची प्रतिमा सप्रेम भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी भगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.

Web Title:  Community Restraint of Twelve Dwarves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.