ऑनलाइनच्या माध्यमातून व्यावसाय विस्तार तंत्रज्ञान आत्मसात न करणाऱ्यांवर संकटाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 08:43 PM2018-10-27T20:43:02+5:302018-10-27T20:59:01+5:30

ऑनलाइनची मार्केटिंग कंपन्याप्रमाणेच अनेक लघु व्यावसायायिक ऑनलाईन मार्केटींच्या माध्यमातून ऑनलाईन व्यावसाय करीत आहेत. त्यामुळे पारंपारिक दुकांदारांची अडचण होऊ लागली असून बदलत्या काळानुसार होणार बदल आत्मसात न करणाऱ्या व्यावसायिकांवर आता संकटाचे ढग दाटू लागले आहे. त्यामुळेच ऑनलाईन कंपन्या आणि होलसेल मॉलच्या विरोधात मोर्चा काढण्याची नामूष्की घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर येऊन ठेपली आहे.

Clouds of crisis on non-acquiring business expansion technologies through online | ऑनलाइनच्या माध्यमातून व्यावसाय विस्तार तंत्रज्ञान आत्मसात न करणाऱ्यांवर संकटाचे ढग

ऑनलाइनच्या माध्यमातून व्यावसाय विस्तार तंत्रज्ञान आत्मसात न करणाऱ्यांवर संकटाचे ढग

googlenewsNext
ठळक मुद्देनवउद्योजकांकडून ऑनलाईच्या माध्यमातून व्यावसायाचा विस्तार तंत्रज्ञान आत्मसात न करणाऱ्या पारंपारिक व्यावसायिकांवर संकट

नाशिक : अमेझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाइनची मार्केटिंग कंपन्याप्रमाणेच अनेक लघु व्यावसायायिक ऑनलाईन मार्केटींच्या माध्यमातून ऑनलाईन व्यावसाय करीत आहेत. त्यामुळे पारंपारिक दुकांदारांची अडचण होऊ लागली असून बदलत्या काळानुसार होणार बदल आत्मसात न करणाऱ्या व्यावसायिकांवर आता संकटाचे ढग दाटू लागले आहे. त्यामुळेच ऑनलाईन कंपन्या आणि होलसेल मॉलच्या विरोधात मोर्चा काढण्याची नामूष्की घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांनी ऑनलाईन आणि मॉल संस्कृतीला विरोध न करता पारंपारिक व्यावसान पद्धतीत बदल करून ऑनलाईनचे तंत्रज्ञाना आत्मसात करून अधिक ग्राहकाभिमूक होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ऑनलाईन कंपन्यांप्रमाणे आपणही तशी मार्केटिंग करून व्यावसाय करू शकतो. माध्यमे उपलब्ध आहेत, त्याचा योग्य वापर करून  आपल्या त्पादनाची माहिती देताना ते कुठे व कसे मिळेल, हे सविस्तर व बिनचूक दिले,  इंटरनेट, वेबसाईट ही मार्केटिंगसाठी चांगली संधी असून त्यांचा फायदा करून घेणे शक्य आहे.  इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आणि झटपट प्रसिद्धी मिळते. त्यामुळे या माध्यमाचा वापर करणाऱ्यांनी त्यांची वेबसाइट आहे त्यांनी  नियमिती बघून अपडेट करणे आवश्यक आहे. आजमितीला कुठलाही व्यापार-उद्योग करायचा म्हणजे मार्केटिंग हे अतिशय महत्वाचे झाले आहे. सध्या ऑनलाइन मार्केटिंगचे प्रस्थ वाढले आहे. अमेेझॉन, स्नॅपडील व फ्लिपकार्टसारख्या  कंपन्यांची त्यांच्या प्रचार प्रसारासाठी जाहीरत करीत असताना पारंपारिक उद्योजकांनी मात्र जाहीरात न करता पारंपारिक ग्राहकावरत आपल्या व्यावसायाची मदार अवलंबून ठेवल्याने आज या व्यावसायिकांना ऑनलाईन आणि होलसेल मॉलची भिती निर्णान झाली आहे.  नवीन पिढी या ऑनलाइन शॉपिंगला चांगली रुळली आहे. मात्र, अजूनही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करणारा मोठा वर्ग आहे. याचा फायदा पारंपारिक व्यावसायिकांनी घेत नवीन तंत्रज्ञानही अात्मसात करण्याची गरज आहे.  काळाप्रमाणे बदल स्विकारून विविध चर्चासत्र, सेमिनार, कार्यक्रमांना उपस्थित राहून तेथे जाऊन प्रत्यक्ष मार्केटिंग,व्यवसायाची माहितीपत्रके, व्हिजिटिंग कार्डस् इ.ची देवाण-घेवाण करण्यासोबतच ऑनलाईम मार्केटिंगचा मार्ग स्विकारण्याची गरज आहे. 

Web Title: Clouds of crisis on non-acquiring business expansion technologies through online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.