धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाभरात स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:57 PM2019-06-16T23:57:25+5:302019-06-17T00:07:34+5:30

मानवतावादी शिकवणद्वारे निरपेक्ष भूमिकेतून समाजोपयोगी, समाजहिताचे उपक्र म राबविणारे रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेरविवारी (दि.१६) सकाळी नाशिक शहर व जिल्हा, जिल्ह्याबाहेरही स्मशानभूमी, दफनभूमी मुस्लीम, ख्रिस्ती कब्रस्तान स्वच्छता अभियान राबवून एक आगळावेगळा उपक्रम समाजासमोर उभा केला. यातून सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले.

Cleanliness drive in Dharmadhikari Pratishthan District | धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाभरात स्वच्छता अभियान

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाभरात स्वच्छता अभियान

Next

नाशिक : मानवतावादी शिकवणद्वारे निरपेक्ष भूमिकेतून समाजोपयोगी, समाजहिताचे उपक्र म राबविणारे रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेरविवारी (दि.१६) सकाळी नाशिक शहर व जिल्हा, जिल्ह्याबाहेरही स्मशानभूमी, दफनभूमी मुस्लीम, ख्रिस्ती कब्रस्तान स्वच्छता अभियान राबवून एक आगळावेगळा उपक्रम समाजासमोर उभा केला. यातून सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले.
या स्वच्छता अभियानमध्ये सुमारे ५२ एकर क्षेत्रात १ हजार ६९३ सदस्यांनी ८१ टन घनकचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. एकूण ४९ स्मशानभूमी, मुस्लीम कब्रस्तान, ख्रिस्ती दफनभूमी येथे स्वच्छता अभियान राबवले. समाजहिताचा विचार करत असता नाशिक जिल्ह्यात असा वेगळा उपक्रम राबविण्यात आला व तो यशस्वीरीत्या पूर्ण केला. नाशिक शहरासह येवला, निफाड, नैताळे, लासलगाव, सुरगाणा, वणी, ओझर, घोटी, इगतपुरी, संगमनेर, लोणी, राहाता, कोपरगाव, अकोले, त्र्यंबकेश्वर, कळमुस्ते, हातलोंढी आदी ठिकाणी स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तान येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुस्लीम समाजबांधवांनीही आजपर्यंत आमच्यासाठी सेवा करण्याचा विचार कोणी केला नसेल पण हा आदर्श डोळ्यासमोर आप्पासाहेबांनी उभा करून दिला, अशा भावना व्यक्त केल्या. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला आम्ही सर्व समाजबांधव शुभेच्छा देतो व भविष्यात अशा उपक्रमात आमचाही सहभाग देऊ, असे याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बोलून दाखविले. अभियानासाठी लागणारे साहित्य प्रतिष्ठानतर्फेपुरवण्यात आले. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सर्वधर्मीयांच्या स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान उपक्रम राबवून समाजासमोर सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला.

Web Title: Cleanliness drive in Dharmadhikari Pratishthan District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.