स्वातंत्र्यदिनी भावली येथे स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:06 PM2018-08-16T23:06:33+5:302018-08-16T23:07:38+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्याचा पर्यटन परिसर स्वच्छ राहावा, या उद्देशाने येथील संतोष मित्रमंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ६५ सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली.

Cleanliness campaign at Independence Day | स्वातंत्र्यदिनी भावली येथे स्वच्छता मोहीम

स्वातंत्र्यदिनी भावली येथे स्वच्छता मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देआदर्श : संतोष मित्रमंडळाचा सहभाग

घोटी : इगतपुरी तालुक्याचा पर्यटन परिसर स्वच्छ राहावा, या उद्देशाने येथील संतोष मित्रमंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ६५ सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली.
निसर्गाने नटलेल्या इगतपुरी तालुक्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नगरसह गुजरातमधील पर्यटकांची संख्या वाढली आहे. परिसरातील सर्वांचे आवडीचे ठिकाण म्हणजेच भावली धरण. या ठिकाणी धरणाच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात लहान मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा दोन-तीन किलोमीटरपर्यंत असतात. या ठिकाणी पर्यटकांची संख्या अधिक असल्याने कचरा रोडपासून ते धबधबा परिसरात नजरेस पडतो. दिवसेंदिवस पर्यटकांकडून परिसर अस्वच्छ होत असून, कुठल्याही प्रकारची यंत्रणा नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी चपलांचा ढीग, विविध प्रकारच्या बाटल्या, फेकलेले अन्न, खाद्यपदार्थांच्या पिशव्या, कपडे, अशा विविध वस्तूंमुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. याची दखल घेत संतोष मित्रमंडळाकडून स्वच्छता करण्यात आली. यात संस्थापक रामदास भोर, ज्ञानेश्वर भोर, एकनाथ कडवे, अमोल मांडे, दीपक साखला, राकेश कस्तुरे, समाधान गोईकणे, प्रभू चव्हाण, नीलेश भोर, अजय भोर, हिरामण भोर, महेश आडोळे सुनील नाठे आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Cleanliness campaign at Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक