शहरात पहाटे दोघे दुचाकीस्वार युवक अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 02:48 PM2019-05-05T14:48:15+5:302019-05-05T14:48:47+5:30

दुचाकीस्वारांनी वेगमर्यादेचे पालन करत हेल्मेटचा वापर करून वाहन चालविण्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांच्या डोक्याला जबर मारल लागल्याचे समोर आले आहे.

In the city, two twin boys were killed in the accident | शहरात पहाटे दोघे दुचाकीस्वार युवक अपघातात ठार

शहरात पहाटे दोघे दुचाकीस्वार युवक अपघातात ठार

Next

नाशिक : शहरातील पाथर्डीफाटा-पाथर्डीगाव रस्त्यावर खड्डयाभोवती लावलेल्या संरक्षक बॅरिकेडला भरधाव वेगात धडकून पल्सरवरील दुचाकीस्वार युवक पहाटेच्या सुमारास ठार झाला. तसेच दुसऱ्या घटनेत सातपूर पोलीस ठाणे हद्दीत श्रमिकनगर भागात एका कारखान्याच्या संरक्षक भिंतीला लागून उभ्या असलेल्या आयशर मालवाहू ट्रकला भरधाव वेगात पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

याबबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंदिरानगर पोलीस पथक पाथर्डीफाटा ते पाथर्डीगावदरम्यानच्या मुख्य रस्त्यावरून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी अचानकपणे जोराचा आवाज आल्याने पथकाने त्यांचे वाहन त्या दिशेने वळविले असता. तेथे एका खड्याभोवती लावण्यास आलेल्या संरक्षक बॅरिकेडला धडकून दुचाकीस्वार गंभीर स्वरूपात जखमी अवस्थेत चेंबरच्या खड्डयात पडल्याचे आढळून आले. पोलीस अमजद पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही नागरिकांच्या मदतीने त्याला खड्डयातून बाहेर काढत तत्काळ जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दुचाकीस्वार विकास बबन आजबे (२४, रा. विराटनगर, सातपूर-अंबड लिंकरोड) असे मयताचे नाव आहे. याच्या ताब्यातील अपघातग्रस्त पल्सर दुचाकीची अद्याप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद झालेली नव्हती. त्यामुळे दुचाकीचा नोंदणी क्रमांक अस्तित्वात नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
दुस-या घटनेत सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रमिकनगर येथे रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या एका आयशर ट्रकला भरधाव वेगात पल्सर दुचाकीस्वाराने (एम.एच १५ जीटी ४८५१) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागला व दुचाकी ट्रकच्या खाली गेली. गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयताचे नाव समजू शकले नाही.
पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात दुचाकी चालविणे दोघा तरूणांच्या जीवावर बेतले असून दोघांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. दुचाकीस्वारांनी वेगमर्यादेचे पालन करत हेल्मेटचा वापर करून वाहन चालविण्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांच्या डोक्याला जबर मारल लागल्याचे समोर आले आहे.

Web Title: In the city, two twin boys were killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.