सिडको परिसर : कारवाईविरोधात जनक्षोम वाढला अतिक्रमणाची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:20 AM2018-05-27T01:20:16+5:302018-05-27T01:20:16+5:30

सिडको : कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोतील २५ हजार घरांवर हातोडा मारण्याची तयारी नव्याने कार्यभार स्वीकारणाºया महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हाती घेत कोणत्याही परिस्थितीत सिडकोतील अतिक्रमणे काढणार असल्याचे सांगितल्याने मनपाच्या या कारवाईविरोधात सिडको भागात जनक्षोभ वाढला होता.

CIDCO premises: Strikes against the action increased the punishment of encroachment sword | सिडको परिसर : कारवाईविरोधात जनक्षोम वाढला अतिक्रमणाची टांगती तलवार

सिडको परिसर : कारवाईविरोधात जनक्षोम वाढला अतिक्रमणाची टांगती तलवार

Next
ठळक मुद्देकारवाई तूर्तास स्थगितअतिक्रमणाची टांगती तलवार सिडकोवासीयांवर कायम

सिडको : कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोतील २५ हजार घरांवर हातोडा मारण्याची तयारी नव्याने कार्यभार स्वीकारणाºया महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हाती घेत कोणत्याही परिस्थितीत सिडकोतील अतिक्रमणे काढणार असल्याचे सांगितल्याने मनपाच्या या कारवाईविरोधात सिडको भागात जनक्षोभ वाढला होता. परंतु, आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत मुख्यमंत्र्यांकडून या कारवाईस तूर्तास स्थगिती आणल्याने सिडकोवासीयांंनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी ही कारवाई तूर्तास स्थगित केली असल्याने सिडकोच्या अतिक्रमणाची टांगती तलवार सिडकोवासीयांवर कायम असल्याने दिसून येत आहे.
सिडकोने बांधलेल्या २५ हजार घरांपैकी सर्वाधिक घरे अल्प उत्पन्न गटासाठी बांधले असून, ९९ वर्षांच्या लिजची घरे असल्याने त्यावर कर्जही मिळत नव्हते. कामगारांच्या कुटुंबांचा विस्तार वाढू लागल्याने त्यांनी हळूहळू घरात वाढीव बांधकामे केली आहेत. ही बांधकामे आजची नसून अनेक वर्षांपासून आहेत. मात्र, सिडकोने घर हस्तांतरण किंवा तारण देताना वाढीव बांधकाम शुल्क वसूल केले असले तरी सिडकोच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी घेतलेल्या चिरीमिरीमुळेच खरं तर सिडकोत वाढीव बांधकामे झाली आहेत. मनपा आयुक्तांनी २५ हजार घरांचे बांधकाम अनधिकृत ठरवित त्यावर हातोडा मारण्याची तयारी सुरू केली असल्याने आयुक्तांच्या या भुमिकेमुळे संपूर्ण सिडकोची जनता व सर्वच राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले होते.
केंद्रात, राज्यात तसेच नाशिक महापालिकेतही भाजपाची सत्ता असून नाशिक दत्तक घेणाºया मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या या प्रश्नासंदर्भात मध्यस्थी केल्याने मनपा आयुक्तांनी अतिक्रमणाच्या रेखांकनाची कारवाई तूर्तास स्थगित केली असली तरी मनपाने भविष्यात रहिवासी भागात पुन्हा अतिक्रमण हटावची कारवाई करू नये अशी ठाम भूमिका सिडकोवासीयांची असून, या मोहिमेस विरोध कायम असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Web Title: CIDCO premises: Strikes against the action increased the punishment of encroachment sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.