श्रीराम जयंतीनिमित्त मिरवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:52 PM2019-04-13T18:52:09+5:302019-04-13T18:52:31+5:30

खर्डे : येथे रामजन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. सायंकाळी संपूर्ण गावातून श्रीराम रथाची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता त्र्यंकेश्वर येथील आनंद महाराज यांचे रामजन्मोत्सवावर कीर्तन पार पडले.

Chiropractic for Shriram Jayanti | श्रीराम जयंतीनिमित्त मिरवणुक

श्रीराम जयंतीनिमित्त मिरवणुक

googlenewsNext
ठळक मुद्देमिरवणुकीत गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सभागी झाले होते.

खर्डे : येथे रामजन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. सायंकाळी संपूर्ण गावातून श्रीराम रथाची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता त्र्यंकेश्वर येथील आनंद महाराज यांचे रामजन्मोत्सवावर कीर्तन पार पडले.
खर्डे गावातील श्रीराम मंदिरात जन्मोत्सवानंतर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यावर्षी नवीन रथ बनविण्यात आला असून, पारंपरिक पद्धतीने लिलावानुसार सर्वात जास्त बोली बोलणाऱ्या नागरिकास या रथ मिरवणुकीचा पहिला मान मिळतो.
यावर्षी येथील शेतकरी जगन्नाथ नथू जाधव यांनी बनविलेल्या नवीन रथाचा १८ हजार ५०० रु पयाला लिलाव घेतला. गल्लीतून येणाºया रथासाठी महिला वर्गाने आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढून रथाचे औक्षण केले.
मिरवणुकीत गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सभागी झाले होते. रविवार (दि १४) यात्रा भरणार असून, रात्री लोकनाट्य तमाशा होणार आहे. तर सोमवार दि १५ रोजी दुपारी ३ वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
खर्डे येथे श्रीराम जन्मोत्सविनमित्ताने आनंद महाराज, त्र्यंबकेश्वर यांच्या कीर्तन सोहळ्याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ.

 

Web Title: Chiropractic for Shriram Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर