ऑनलाईन खरेदी विक्री संकेतस्थाळावरून नाशिकच्या ग्राहकाची फसवणूक ; मोबाईल दाखवून विकला अंघोळीचा साबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:35 PM2019-02-23T16:35:21+5:302019-02-23T16:38:12+5:30

आडगाव शिवारातील कोनार्कनगर परिसरातील एका तरुणाची ओएलएक्स या आॅनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावरून एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला आहे. 

Cheating of Nashik's customer from online shopping website; Wallets sold by mobile phones | ऑनलाईन खरेदी विक्री संकेतस्थाळावरून नाशिकच्या ग्राहकाची फसवणूक ; मोबाईल दाखवून विकला अंघोळीचा साबन

ऑनलाईन खरेदी विक्री संकेतस्थाळावरून नाशिकच्या ग्राहकाची फसवणूक ; मोबाईल दाखवून विकला अंघोळीचा साबन

Next
ठळक मुद्दे तरुणाची ऑनलान खरेदी-विक्री संकेतस्थळावरून फसवणूक नाशिकच्या तरुणाला मोबाईल दाखवून विकला अंघोळीचा साबन

नाशिक : आडगाव शिवारातील कोनार्कनगर परिसरातील एका तरुणाची ओएलएक्स या आॅनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावरून एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला आहे. 
आडगावच्या कोनार्कनगर येथील हितेश विसपुते याने ओएलएक्स संकेतस्थळाच्या माध्यमातून जुना आयफोन खरेदी केला होता. त्यासाठी त्याने सुमारे दहा हजार रुपयांची रक्कम मोजली. मोबाइलचे पार्सल त्याला मिळाल्यानंतर त्याने कुरिअर कंपनीच्या प्रतिनिधीकडून पार्सल सोडवूनही घेतले. मात्र त्यात आयफोनऐवजी आंघोळीचा साबण व हेडफोन मिळाल्याने हितेश याला धक्काच बसला. त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, या प्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ओएलएक्सवर बुक केलेला सेकंड हॅण्ड अ‍ॅपल आयफोन सोडवून घेतला असता त्यात त्याला आयफोनऐवजी आंघोळीचा डव्ह साबण व हेडफोन मिळाल्याची घटना आडगाव शिवारातील कोणार्कनगर भागात घडली आहे. या प्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणार्कनगर येथी सार्वजनिक वाचनालयाजवळ असलेल्या बालाजी चौकात हितेश शंकर विसपुते हा राहतो. त्याने दि. 18 ते 21 फेब्रुवारीदरम्यान घरी असताना ओएलएक्सवर दहा हजार रुपयांचा सेकंडहॅण्ड अ‍ॅपल आयफोन मोबाईल बुक केला होता. त्या बदल्यात त्याने 9899588672 या क्रमांकाच्या संशयित मोबाईलधारकाला दहा हजार रुपये दिले व मोबाईलची मागणी केली. दरम्यान, या संशयिताने मोबाईल कुरिअरमार्फत पाठवितो, असे सांगितले; मात्र हे कुरिअर पाठविताना त्याने फोनच्या बॉक्समध्ये डव्ह साबण व हेडफोन पाठवून देत फसवणूक केली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे एपीआय बिडगर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Cheating of Nashik's customer from online shopping website; Wallets sold by mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.