आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार ; जिल्हाधिकारी आले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:20 AM2018-12-27T01:20:27+5:302018-12-27T01:20:44+5:30

महापालिका आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार असताना एका भूखंडाच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केलेली खटपट अडचणीची ठरली

Charge of charge of the post of commissioner; The Collector came in trouble | आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार ; जिल्हाधिकारी आले अडचणीत

आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार ; जिल्हाधिकारी आले अडचणीत

Next

नाशिक : महापालिका आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार असताना एका भूखंडाच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केलेली खटपट अडचणीची ठरली असून, एका उपअभियंत्याला तात्पुरत्या स्वरूपात थेट अधीक्षक अभियंता बनवून टिप्पणी लिहून घेणे आणि महत्त्वाचे म्हणजे तत्काळ मोबदल्याचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे पाठविणे यांसारखे गंभीर आरोप बुधवारी (दि.२६) महापालिकेच्या स्थायी समितीत करण्यात आले. त्यामुळे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले आहे.  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे कार्यभार देऊन कार्यमुक्त होण्याचे आदेश शासनाने दिले होते. गेल्या महिन्यात हे कार्यभार आल्यानंतर खरे तर प्रभारी आयुक्तांनी केवळ अतितातडीची कामे करणेच अपेक्षित असताना जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तपदाचा एकत्रित कार्यभार असताना त्यांनी धाडसी निर्णय घेतला.
पहिलेच जिल्हाधिकारी
महापालिकेच्या इतिहासात प्रभारी आयुक्त म्हणून काम करताना अशाप्रकारचा मोठा आर्थिक निर्णय घेणारे राधाकृष्णन हे पहिलेच ठरले आहेत. महापालिकेत आता त्यांच्यावर थेट आरोप आहेत, शिवाय महासभेच्या ठरावानुसार या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचा प्रस्ताव आहे.
अन् धनादेश वटला..
४२१ कोटी रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांनी जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर आता तो वटला आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या खजिन्यात असून, ही रक्कम परत मिळावी, अशी नगरसेवकांची मागणी आहे.

Web Title: Charge of charge of the post of commissioner; The Collector came in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.