बदलत्या वातावरणाचा आंब्यावर होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 04:21 PM2019-02-16T16:21:10+5:302019-02-16T16:22:59+5:30

खामखेडा : देवळा-कळवण गिरणा नदीच्या काठावरील खामखेडा गावाच्या दोन्ही बाजुनी मोठया प्रमाणात आब्याच्या विविध प्रकारच्या झाडे असल्याने या भागात आब्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन येत आसे परंतु आब्याच्या झाडाची संख्या घटल्याने उत्पानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 Changing atmosphere will be a mango! | बदलत्या वातावरणाचा आंब्यावर होणार!

बदलत्या वातावरणाचा आंब्यावर होणार!

Next
ठळक मुद्देखामखेडा : यंदा आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता

खामखेडा : देवळा-कळवण गिरणा नदीच्या काठावरील खामखेडा गावाच्या दोन्ही बाजुनी मोठया प्रमाणात आब्याच्या विविध प्रकारच्या झाडे असल्याने या भागात आब्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन येत आसे परंतु आब्याच्या झाडाची संख्या घटल्याने उत्पानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सघ्या गिरणा परिसरातील काही आब्याच्या झाडाना मोहर आला आसूनझाडाना कैरयाही लागल्या आहेत. काही झाडाना अजुन मोहर येणे बाकी आहे. या ढगाळ वातावरणामुळे आलेल्या मोहरावर व लागल्या कैर्यानवर व येण्याऱ्या मोहारावर मागे झालेल्या बेमौसमी वादळी वार्यामुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी कळवण-देवळाच्या गिरणा नदीच्या काठावर आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात होती. म्हणून त्याला अमराई म्हणून म्हटले जात असे. या ठिकाणी शेंद्रया, दोडी, साखºया, पिठाल्या, भोपळया, कलम्या अशा चव, रंग आकारानुसार आंब्याच्या झाडाला नावे असत. या आमराईत गावाच्या प्रत्येक वाझ किंवा भाऊबंकीच्या आंब्याच्या झाडे लावली असायची. परंतु कालांतराने आंब्याच्या जुन्या झाडे मोठ्या प्रमाणात तोडली गेली. परंतु त्यांच्या जागी नवीन झाडाची लागवड झाली नाही. आणि जी काही लागवड झाली. ती गावठी आंब्याची न होता. ती कलमी आब्यांची झाली असली तरी ती चवदार नाहीत. पूर्वी शेतातही भरपूर प्रमाणात आंब्याची झाडे असायची. त्यामुळे प्रत्येकाकडे भरपूर आंबे असायचे. परंतु शेतीचा विकास झाला. शेतातील आब्यांची झाडे काढून टाकली. त्यामुळे ऐके काळी शिवारात दांट दिसणारी आंब्याची झाडे आता शिवारात दिसत नाहीत. जी काही आहेत त्यांनी निसर्गाचा बदलत्या वातावरणाचा फटका बसतो, त्यामुळे याही वर्षी आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (फोटशे मॅँगो ट्रि)

Web Title:  Changing atmosphere will be a mango!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान