Changes in the online and action taken by teachers about illegal practices | आॅनलाइन बदली गैरप्रकाराबाबत शिक्षकांवर होणार कारवाई
आॅनलाइन बदली गैरप्रकाराबाबत शिक्षकांवर होणार कारवाई

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षण विभागाकडून आज सुनावणी

नाशिक : शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यामध्ये विस्थापित शिक्षकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने प्रकरण गांभिर्याने घेत खोटी माहिती सादर करून गैरफायदा घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाइचे संकेत आहेत. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग शुक्रवारी (दि. २०) व शनिवारी (दि. २१) १६६ शिक्षकांची सुनावणी घेणार आहे.
शासनाने जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांची आॅनलाइन बदलीप्रक्रिया पूर्ण केली आहे. यात ज्या शिक्षकांनी विशेष संवर्ग १ व २ मध्ये खोटी अथवा चुकीची माहिती भरून बदल्या करून घेतल्या आहेत अथवा बदलीतून सूट घेतली आहे. अशा सर्व १६६ शिक्षकांची २० व २१ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सुनावणी घेण्यात येणार
आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने यासाठी वेळापत्रक तयार केले असून, प्रकियेत सर्व शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून, यासाठी गट शिक्षण अधिकाºयांसह वैद्यकीय अधिकारी, उपअभियंता यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Web Title:  Changes in the online and action taken by teachers about illegal practices
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.