पाणीमीटर बदला, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:30 AM2018-02-25T01:30:35+5:302018-02-25T01:30:35+5:30

महापालिकेने अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध शोध मोहीम अधिक तीव्र केली असून, पाणीचोरी करणाºयांविरुद्ध पोलिसांत थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. दरम्यान, पाहणीत अनेक ठिकाणी पाणीमीटर नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहे.

Change the water meter, otherwise take action | पाणीमीटर बदला, अन्यथा कारवाई

पाणीमीटर बदला, अन्यथा कारवाई

Next

नाशिक : महापालिकेने अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध शोध मोहीम अधिक तीव्र केली असून, पाणीचोरी करणाºयांविरुद्ध पोलिसांत थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. दरम्यान, पाहणीत अनेक ठिकाणी पाणीमीटर नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, संबंधित नागरिकांनी नादुरुस्त पाणीमीटर तातडीने महापालिकेत नोंदणी करत बदलून घ्यावे, अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.  नाशिक महानगर-पालिकेने अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी अभययोजना राबविली होती. या योजनेदरम्यान, फक्त २५१० नळजोडणीधारकांनी आपली नळजोडणी अधिकृत करून घेतली होती. सदर योजनेस नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे महानगरपालिकेने दि. २१ फेब्रुवारीपासून अनधिकृत नळजोडण्या शोधून त्या बंद करणे व नळजो-डणीधारक व त्यास जबाबदार असलेले नळ कारागीर (प्लंबर) यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सर्व विभागांतील पाणीपुरवठ्याचे अभियंते यांच्यामार्फत कारवाई सुरू असून, आतापर्यंत ६८ अनधिकृत नळजोडण्या शोधून नळजोडणीधारकांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अजूनही अनधिकृत नळजोडणीधारकांनी तातडीने स्वत:हून नाशिक महानगरपालिकेशी संपर्क साधून दंड व पाणी वापराचे शुल्क भरून नळजोडण्या अधिकृत करून घ्याव्यात. जे अनधिकृत नळजोडणीधारक तातडीने नळजोडण्या अधिकृत करून घेतील त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात येणार नाही तथापि, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तसेच आजपर्यंत बेकायदेशीरपणे वापरलेल्या पाण्याचे शुल्क वसूल केले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. दरम्यान, पाहणीत नळजोडणीधारकांचे पाणीमीटर नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधितांनी स्वत:हून तातडीने महापालिकेत नियमाप्रमाणे नोंद करून मीटर दुरुस्त करून घ्यावे अथवा बदलून घेण्याची कार्यवाही करत त्याची महापालिकेत नोंद करावी, अन्यथा त्यांच्यावरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
४३ टक्क्यांपेक्षा जास्त हिशेबबाह्य पाणी
शहरातील सहा विभागात नागरिकांपर्यंत सुमारे ३५१.८२ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी वितरीत करण्यात येते. शहरात १ लाख ८९ हजार ५३ नळजोडण्या असून, त्याद्वारे फक्त २०० दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाण्याची आकारणी होत आहे. तसेच पाणीपुरवठा व्यवस्था चालविण्यासाठी होणारा खर्च व पाणीपुरवठ्यापासून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने यात मोठी महसुली तफावत आहे व त्यामुळे महापालिकेची पाणीपुरवठा योजना तोट्यात आहे. शहरातील बहुसंख्य नळजोडण्यांना असलेले पाणी मीटर नादुरु स्त आहेत तसेच काही नळजोडणीधारकांनी मीटर काढून टाकलेले असल्याचे आढळले आहे. त्यामुळे हिशोब बाह्य पाणी ४३ टक्क्यांपेक्षा जास्त दिसून येत असल्याने वॉटर आॅडिटमध्ये आढळून आले आहे.

Web Title: Change the water meter, otherwise take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.